Posts

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

Image
मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा - राजापूर ® संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. नमस्कार!🙏🏻 रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबईतील " पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र, दादर (पूर्व) येथे *मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर ® संस्थेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कमी गणसंख्येच्या उपस्थिती मुळे सभा तहकूब करून ३० मिनिटांनी त्याच ठिकाणी सभा पुन्हा सुरू करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांनी या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले.  सदरील सभेत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. • मागील सभेचे इतिवृत वाचन आणि संमत करणे. • वार्षिक जमा खर्च अहवाल वाचन आणि संमत करणे. • लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा - आरोग्य विषयक पुढील धोरण. • नवीन कार्यकारणी निवड - स्वागत आणि मनोगत • वार्षिक निधी संकलन - प्राथमिक नियोजन चर्चा संस्थेच्या मागील सर्व साधारण सभेचे इतिवृत वाचन श्री. विनीत म्हादये यांनी केले. या संदर्भातील कृती अहवालाचे वाचन सचिव श्री. अजय मांडवकर यांनी केले. संस्थेचे सल्ला...

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

Image
―८ वा वर्धापन दिन सोहळा ―गोळवशी-वडदहसोळ पूलप्रकल्प लोकार्पण सोहळा #आग्रहाचे निमंत्रण!🌹 हे निमंत्रण एकजुटीचे🤝 हे निमंत्रण आपुलकीचे❣️ हे निमंत्रण एकनिश्चयाचे✊🏻 हे निमंत्रण स्नेहसंमेलन सोहळ्याचे...🌹 मुचकुंदी नदीवर बहुप्रतिक्षित लांजा राजापूर दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या "स्वप्नपूर्ती गोळवशी-वडदहसोळ" पूलाचा लोकार्पण सोहळा* आणि एमपीव्हीएस संघटनेचा ८वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१७ मे, २०२५ रोजी दु. ३ते रात्रौ ११:०० वाजता श्री. जाकादेवी मंदिर, वडदहसोळ ता. राजापूर* याठिकाणी आयोजित करण्यात येत असून सदर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. धन्यवाद! #आपली संस्था, आपला परिवार!😊 स्वागतोत्सुक,🙏🏻 #मुचकुंदी परिवार, #मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर (रजि.)

लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नुतन इमारतीच्या कामाला मुहूर्त कधी...?

Image
―इमारतीच्या बांधकामाला सुरुवात कधी होणार ?? लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उदघाटनाचा मुहूर्त प्रदीर्घ काळानंतर उद्या सकाळी ठीक  १०:०० वाजता.  दरम्यान श्रेयवादाच्या भोवऱ्यात गुंतून न जाता एमपीव्हीएस संस्थेच्या मागण्यांची सविस्तर बाब कळणे गरजेचे. जिल्हा शासनासह आरोग्य प्रशासनाला एपीव्हीएसचा ईशारा. याआधी कित्येक वेळा पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा यावर पत्रव्यवहार, पाठपुरावा झाला.जनतेची हाक प्रशासनापर्यत पोहचली तरी शासनाची मनोधारणा होत नाही व त्यावर पुढे कार्यवाही होत नाही. ही वस्तुस्थिती आजही आढळते. संस्थेने लांजा आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा बळकटीसाठी केलेल्या अधिकतम मागण्यांचे लवकरच जिल्हा शल्यचिकित्सक -  अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण हवे. नसल्यास जनतेचा रोष कायमच राहणार..  संस्थेने अनेक वेळा यासाठी पाठपुरावा केला. लांजा रुग्णालय जागा हस्तांतरण बरोबरच अनेक बाबी यांचा पर्दाफाश केला. रुग्णालयांना भेट देत, अभ्यास दौऱ्यातून माहिती गोळा करत भव्य आरोग्य सभांचे आयोजन झाले. आणि पुढे जे झाले ते अवघ्या लांजा राजापूर वासियांनी पाहिले. खऱ्या अर्थाने शासन प्रश...

एमपीव्हीएस ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत रक्तदान शिबिर🩸लांजा येथे संपन्न....

Image
एमपीव्हीएस ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत रक्तदान शिबिर🩸 लांजा येथे संपन्न; ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"

Image
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! रक्तदान हेच श्रेष्ठ दान; रक्तदान मोहिमेतून  एमपीव्हीएस जपत आहे रक्ताचं नातं!            मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर ही सामाजिक संस्था जात - पात - धर्म न मानता तसेच राजकारण विरहित असे सर्वसमावेशक "आपण आपल्यासाठी बनविलेले संघटन" असून मागील सात वर्षे लांजा - राजापूर तालुकास्तरावर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक ऋणानुबंध जपत आहे. तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्यादृष्टीने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटन आदी मूलभूत सुविधा बळकटीकरणासाठी संस्था सक्रियपणे कार्यरत आहे. ग्रामीण स्तरावर "आरोग्य" ही बाब अतिसंवेदशील असून संस्थेच्यावतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधत दरवर्षी ग्रामीण स्तरावर 'आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर’ उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे यावेळी लांजा येथे ग्रामीण टीम (लांजा - राजापूर) अंतर्गत रविवार ८ ऑक्टोबर, २०२३ रोजी "श्री. स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटल, लांजा" याठिकाणी  ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत सकाळी ०९ ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत "भव्य रक्तदान शिबीर" आयोजन केले आहे.     ...

मुचकुंदी परिसर विकास संघ तर्फे राजापूर,ओणी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन...

Image
―चला निर्माण करूया कोकण पॅटर्न... #MPVS संस्थेच्यावतीने ओणी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबीर;लांजा-राजापूर तालुक्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना  शैक्षणिक परिसंवादाचे आवाहन..... #रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३ #सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत  #श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय-ओणी, राजापूर  ✍🏻करियर म्हणजे काय...? योग्य करिअर कसे निवडू..? गोंधळून जाऊ नका.  याचसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग अंतर्गत "मार्गदर्शन आमचे, निवड तुमची” या संकल्पनेचा एक भाग म्हणून ग्रामीण स्तरावर रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत राजापूर तालुक्यातील "श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय, ओणी" येथे शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थी भविष्यातील करियरच्या विविध वाटा, त्यादृष्टीने आपली वाटचाल, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यातून आपली पुढील वाटचाल याविषयी जाणून आपल्या भविष्यातील करिअरमधील ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्या शाळेतील - महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थि...

लांजा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची वानवा,प्रशासन व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष..!

Image
― ग्रामीण स्तरावरील आरोग्यसुविधा पुरविणारे शासकीय ग्रामीण रुग्णालय आजारी; उपचारांभावी स्थानिकांचे आरोग्य  धोक्यात. ग्रामीण रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, असुविंधा तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुवे गावातील दोन जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू ही घटना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयावरील जनतेचा विश्वास कायमचाच उडवणारी.  दि. १० नोव्हेंबर, २०२२ रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास वारेशी कुटुंबियातील गर्भवती महिलेला शासकीय ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी उपचारांभावी आणि यंत्रणेतील असुविधांमुळे तसेच निर्णयातील दिरंगाईमुळे त्यांना अखेरीस पाचव्या दिवशी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास सांगितले गेले. अशातच १०८ रुग्णवाहिकेमध्येच दोन निष्पाप जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून झाल्याची बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवार दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुग्णालयातील अधिकारांची भेट घेतली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक श्री. सतीश ...