नवीन संकल्पना:- Web Site मुचकुंदी परिसर विकास संघाच्या माध्यमातून नव्या पर्वासाठी, नव्या संकल्पनेतुन परिसरातील लोकांसाठी संघाची अधिकृत वेब साईट निर्मिती करून त्याद्वारे निरनिराळ्या विषयाची, व्यवसाय किंवा ठिकाणांची माहिती घरबसल्या मिळू शकते.सोशल मीडिया हे एक विकासाचे, प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे.संघाने हीच कल्पना वापरून वेबसाईट निर्मितीसाठी आश्वासक पाऊल टाकले आहे.यामुळे परिसरातील व्यापारी,उद्योजक,कामगार,कलाकार,शेतकरी व ते करत असलेले व्यवसाय जगापर्यंत जोडला जाणार आहे.यामुळे परिसरातील पर्यटनाला,ग्रामीण भागातील वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ अपेक्षित आहे. किंबहुना जोडधंदा विकसित करण्याचे उत्तम साधन होणार आहे... तरी कुणाला आपल्या व्यवसाय,कला, शुभेच्छा किंवा अन्य स्वरूपातील जाहिरात घ्यावयाची असेल तर आपण जाहिरात अर्ज भरून आपल्या जाहिरातीची माहिती प्रस्तावित करून संघास देणे. आमचा असा मानस आहे की, आपले संलग्न गाव तसेच लांजा-राजापूर मधील गावामध्ये रोजगार चालवणारे हे संघाच्या वेब साईटमुळे एका छत्राखाली यावेत, जेणेकरून त्यांची जाहिरात होईल व ज्या कोणालाही गरज असेल तो ती जाह...