Posts

Showing posts from October, 2017

मुचकुंदी नदीवर पूल होणार की नाही...??

Image
सोमवार दि. ३० ऑक्टो,२०१७ स.न.वि.वि मुचकुंदी परिसर विकास संघाच्या सर्व सदस्यांसाठी एक आनंदाची ही घटना आहे.संघटनेचे अध्यक्ष,कार्यकारी पदाधिकारी,सर्व सदस्य,हितचिंतक यांचे प्रथम मनःपूर्वक अभिनंदन.. आज परत एकदा मुचकुंदी नदीवर *प्रस्ताविक पूलाच्या ठिकाणी* सा.बां.उ. विभाग,लांजा चे अधिकारी यांनी पुन्हा एकदा पाण्याची खोली, दोन्ही बाजूच्या अंतराचा अखेरचा शिक्का मोर्तुब करून पूलाचे चित्र तयार केले आहे.. त्याचबरोबर या पूलास मागणीचा दावेदार म्हणून संघाचा उल्लेख.. आपले कृपाभिलाषी, मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर)

संघाची अधिकृत वेबसाईट तयार होत आहे...!!

Image
​नवीन संकल्पना:- Web Site​ मुचकुंदी परिसर विकास  संघाच्या माध्यमातून नव्या पर्वासाठी, नव्या संकल्पनेतुन परिसरातील लोकांसाठी संघाची अधिकृत वेब साईट निर्मिती करून त्याद्वारे निरनिराळ्या विषयाची, व्यवसाय किंवा ठिकाणांची माहिती घरबसल्या  मिळू शकते.सोशल मीडिया हे एक विकासाचे, प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे.संघाने हीच कल्पना वापरून वेबसाईट निर्मितीसाठी आश्वासक पाऊल टाकले आहे.यामुळे परिसरातील व्यापारी,उद्योजक,कामगार,कलाकार,शेतकरी व ते करत असलेले व्यवसाय जगापर्यंत जोडला जाणार आहे.यामुळे परिसरातील पर्यटनाला,ग्रामीण भागातील वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ अपेक्षित आहे. किंबहुना जोडधंदा विकसित करण्याचे उत्तम साधन होणार आहे... तरी कुणाला आपल्या व्यवसाय,कला, शुभेच्छा किंवा अन्य स्वरूपातील जाहिरात घ्यावयाची असेल तर आपण जाहिरात अर्ज भरून आपल्या जाहिरातीची माहिती प्रस्तावित करून संघास देणे. आमचा असा मानस आहे की, आपले संलग्न गाव तसेच लांजा-राजापूर मधील गावामध्ये रोजगार चालवणारे हे संघाच्या वेब साईटमुळे एका छत्राखाली यावेत, जेणेकरून त्यांची जाहिरात होईल व ज्या कोणालाही गरज असेल तो ती जाह...

ओणीत प्रथमच करिअर मार्गदर्शनाचे आयोजन.

Image
करिअर मार्गदर्शन एक प्रेरणादायी शिबीर  समाजात जनजागृती आणि समाजप्रबोधिनी विचार हे लोककला व नव-नवीन उपक्रम तसेच कार्यक्रमातून  पोहोचविले जातात.  हे आपण आपल्या पूर्वाजांकडून शिकत आलो. आजची आपली पिढी ही स्पर्धात्मक युगात जीवन जगत आहेत. अशा स्पर्धात्मक युगात टिकायचे तसेच उज्वल भविष्य घडवायचे असेल तर हवयं ते फक्त योग्य मार्गदर्शन! मेहनतीला हवी जिद्द, चिकाटी ओणीत प्रथमच करिअर मार्गदर्शनाचे आयोजन. मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) यांच्या माध्यमातून परिसरातील माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उत्तम आणि प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात येत आहे. तरी या शिबीरात लांजा-राजापुर परिसरातील विद्यालयाने आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवुन लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!!! प्रगतीच्या उज्वल भविष्यासाठी हवय मोलाच मार्गदर्शन... चला तर मग जाणून घेऊया करिअर मार्गदर्शनाचे फायदे मग नक्की भेटूया..... ठिकाण:- श्री. गजानन मंगल कार्यालय, ओणी               ता. राजापुर, जि. रत्नागिरी तारिख ...

शुभेच्छा दिपावलीच्या!!!

Image
मुचकुंदी परिसरातील सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! हे नववर्ष आपणांस  नवचैतन्यभरी, सुख-समृद्धी, भरभराटीचे अस  आनंदी  आणि आरोग्यदायी  जावो हीच  दिपावलीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!! 

पाहणी नदी पात्राची अनुकूल - मुचकुंदी नदीवरील पुलाच्या आराखड्याचे मोजमाफ करण्यास नदीकाठीसा. बां. विभाग लांजाचे अधिकारी व कर्मचारी .

Image
साऱ्यांचेच लक्ष आता मुचकुंदी नदीवरील पुलाच्या बांधणीकडे .... सर्वाच्याच मनात कित्येक वर्षे घर करून लांबणीवर राहिलेले स्वप्न म्हणजे मुचकुंदी नदीवरचा प्रलंबित पूल अखेर मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा - राजापूर) संघटनेच्या  संघटन या भावनेतून लवकरच साकार होणार.. मुचकुंदी नदीवर पुलाच्या बांधणीस मोजमाफ करताना सा. बां.वि. लांजा अधिकारी व गोळवशी -वडदहसोळ स्थानिक मंडळी प्रास्ताविक पुलाचे काम नाबार्ड २३ या योजनेअंतर्गत प्रस्तापित होऊन येथील  सर्व  स्थानिक  जनतेला दिलासा.   मुचकुंदी नदीवर ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते जाकादेवी मंदीर (वडदहसोळ) दरम्यान पूल प्रकल्पाच्या  पूर्वचाचणी व मोजमाफ करण्यास  सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा कर्मचारी व अधिकारी  मुचकुंदी नदीच्या पात्राची लांबी - रुंदी तसेच पुलाची उंची यांचे मोजमाफणी करण्यास आज सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी नदीची भेट घेतली. नदीच्या दोन्ही काठावर देवी देवतांचे वास्तव्य आहे. भौगोलिक दृष्ट्या सुंदर असा परिसर भव...

नाबार्ड यादीत मुचकुंदी नदीवरील प्रलंबित पूल आता मार्गी लागणार....

Image
मित्रहो, अत्यंत गोड बातमी  ........  नाबार्ड  यादीत   " मुचकुंदी नदीवर ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते जाकादेवी मंदिर (वडदह सोळ)" दरम्यान पूलबांधणी काम अधोरेकीत केले गेले आहे. जे ३० वर्षे जमले नाही ते  मुचकुंदी परिसर विकास संघा च्या संघटन या संकल्पनेतून आणि त्यांच्या  अथक प्रयत्नातून  प्रलंबित पूल आता मार्गी लागणार.....    लवकरच साऱ्यांचे स्वप्न साकार होणार......  लांजा व राजापुर या दोन तालुक्यांच्या सीमेवरून मुचकुंदी नदी प्रवाहित आहे. पावसात ही नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे दोन्ही तालुक्यातील गांवचा एकमेकांशी संपर्क तुटला जातो तसेच वडदहसोळ गावांत असलेल्या हायस्कुलला शिक्षण घ्यावयास जाणाऱ्या गोळवशी गावातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, कधी कधी ही मुले जीवघेणा होडीप्रवास करून माध्यमिक शिक्षण घ्यावयास जातात. त्यामुळे येथील तरुण पर्यायाने शहरात स्थलांतर करतात आणि चांगली चांगली हुशार मुले आपल्या भविष्याचा खेळ खंडबो करून बसतात कारण शहरातील शिक्षण सर्वसामान्य मुलांना परवडणारे नसते, राह...

परेल येथे महत्वपूर्ण सभा,

Image
स . न . वि . वि .! उपरोक्त संघटनेच्यावतीने आपणांस कळविण्यात येते आहे की , रविवार दि . १५ ऑक्टो , २०१७ रोजी , " सोशिअल सर्विस लीग " परेल येथे   सायं . ठीक ३ ते ६ वाजता   " महत्वपूर्ण सभेचे " आयोजन करण्यात आले आहे . आपल्या गावच्या मातीशी जडलेली नाल आणि जिथे आपण जन्माला आलो त्या जन्म्भुमीचा विकास व्हावा अशी सर्वांचीच मनभावना असते . प्रथमच आपल्या परिसरात विकासात्मक दृष्टीने संकल्पित विचार करणारे व्यासपीठ निर्माण होऊन आपण सर्व एकत्र येऊन संघाच्या छत्राखाली   संघटीत   झालेले आहोत . परिसराचा विकास व्हावा याकरिता आपल्या सहकाराबरोबर आपले विचार व प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे व्यासपीठ लाभले आहे . जर परिवर्तन घडवायचे असेल , तर आपल्यातील असणाऱ्या प्रबोधनकारी विचारांना जागे केलेच पाहिजे . बदल स्वतःपासून करायला हवा .  परिवर्तन   हे शक्य आहे . केव्हा ? जेव्हा तुम्ही आम्ही एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करू .  तेव्हा ? वेळ आलेली आहे ;  चांगलं काही क...

सभासद आवाहन

Image
 

सबस्क्राईब ब्लॉगर

Image
मुचकुंदी परिसर विकास संघ  ( लांजा-राजापुर ) मुंबई   रजि . धरु एकात्मेची कास, करू परिसराचा विकास ! आपणास या संघाच्या संकल्पना आवडल्यास  नक्की या ब्लॉग ला भेट दया!  सबस्क्राईब या बटणावर क्लीक करून तिकडे आपला मेल आयडी प्रविष्ट करा आणि कॅपच्या (अंक,अक्षरे) लिहून सबस्क्रिप्शन विनंती पाठवा व आपल्या मेलवर आलेल्या लिंकवर क्लीक करून नक्की सबस्क्राईब करा. जर संघटनेच्या संकल्पना व कार्य आपणास आवडल्यास नक्की भेट द्या  

आरोग्य_शिबीर_दिमाखात_संपन्न

Image
परिसराच्या सर्वांगीण विकासपर्वातील उल्लेखनीय कामगिरी... रविवार दि. १ ऑक्टो, २०१७ रोजी कोंडये (लांजा) येथे " मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा- राजापुर) मुंबई रजि." आयोजित " मोफत आरोग्य तपासणी शिबीर " अत्यंत नियोजनबद्द व दिमाखात संपन्न. उत्कृष्ट असे शिबीराचे नियोजन करून विकासपर्वात कौतुकास्पद झेप, सोबत दिलेल्या चित्रातुन दिसुन येते. उपक्रमा दरम्यान उपस्तिथ कोंडये गावप्रमुख, ग्रामस्थ, महिला, कोंडये सरपंच बाई, कोंडये शाळा नं. १ चे मुख्याध्यापक, श्री. दत्तसेवा ट्रस्ट,पेंडखळे विश्वस्थ, संघाचे पदधिकारी, आरोग्य संघटक, आणि कार्यकर्ते इत्यादी.