द्वितीय वर्धापनदिन सोहळा-18 नोव्हेंबर
नमस्कार मंडळी, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूरतर्फे संघाच्या वर्धापनदिन निमित्ताने भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे कार्यक्रम स्थळ: दिनांक -18 नोव्हेंबर 2018 वार- रविवार वेळ- सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत स्थळ- श्री एम. डी. आहुजा ट्रस्ट, 132,सेंट पॉल स्ट्रीट,एम. डी. ट्रस्ट बिल्डिंग,फन एन शॉप च्या मागे,हिंदमाता, दादर (पूर्व) मुंबई-400014 ज्याची आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपणा सर्वांच्या एकजुटीने गेल्या दोन वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविले आणि यशस्वीही केले..नियोजन टीम हा सोहळा "न भूतो न भविष्यती" करण्यासाठी सज्ज आहे.. वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबंध. संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाचे कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळ...