मुचकुंदी नदीवरील गोळवशी ते वडदहसोळ या मार्गावर शासनाची पूलप्रकल्पाला मंजुरी....
*- सेतू बांधा रे बांधा* *पहिल्या पर्वाची यशस्वी वाटचाल✈* मित्रहो, सप्रेमपुर्वक नमस्कार वि.वि.!🙏🏻 ✍🏻भिन्न विचारांना जुळविण्यास हवा असतो तो "सहकार सेतू" त्याप्रमाणेच दोन भिन्न रूपाना एकरूप करण्यास हवा असतो तो फक्त "स्नेहहेतू! समांतर रेषा कधीही एकत्र येत नाही खर आहे मात्र दोन समविचारी एकत्र आले तर इतिहास घडतो! त्यात अवघाची सहकार आणि विश्वास हाच एकमेव दुवा ठरत ऋणानुबंध घडत राहतो. सहकाराची भावना आहे, सत्यात उतरायची तयारी आहे, वास्तवाशी झुंज द्यायला मनुष्यबळ आहे मग दोन प्रांत एक होणे सहाजिकच! अशीच एक *वास्तवदर्शी संघर्षमय कहाणी आहे लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमेवरुन प्रवाहीत मुचकुंदी नदीवरील पूलाची.* नदीकाठी वसलेल्या गोळवशी-वडदहसोळ ही गावं कित्येक वर्ष नदीप्रवाहामुळे एकमेकांपासून दूर होते. शाळकरी मुलांचा, ग्रामस्थांचा जीवघेणा होडीप्रवास आणि दळणवळणदृष्टया गंभीर समस्येखाली हा परिसर अविकसित निपचिप पडून होता. आपापल्यापरीने दोन गांव जोड करण्यास नदीवर पूलबांधणी व्हावी म्हणून एकेरी झुंज चालली होती. परंतू ...