Posts

Showing posts from 2020

मुचकुंदी नदीवरील (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ...

Image
महत्वाकांक्षी (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ अखेर भुमीपूजनानंतर लगेचच (वडदहसोळ-गोळवशी) महत्वाकांक्षी स्वप्नपूर्ती पूलाच्या कामास १ मार्च २०२० रोजी प्रारंभ झाला त्यावेळचे हे क्षणचित्र. "मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर" या सामाजिकसंघटनेने परिसरातील संलग्न ग्रामपंचायत, गावकरी ग्रामस्थांच्या आणि MPVS शिलेदारांच्या साथीने प्रलंबित पूलाची मागणी अथक पाठपुराव्याने मार्गी लावण्यात यश आले..  दरम्यान विकासकामांचा पाठपुरावा* करताना तालुकावासियांनी वेगवेगळ्या स्तरातून हितचिंतक म्हणून पाठीशी राहिले. त्यामुळे यापुढे आरोग्य विषयाचा पाठपुरावा व्हावा यासाठी सर्वांच्याच् अपेक्षा उंचावल्या आहेत. 📸फोटोग्राफी सौजन्य: श्री गणेश खानविलकर―उपाध्यक्ष मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

वडदहसोळ हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकवृंदाने दिली मुचकुंदी नदीला भेट....

Image
―वडदहसोळ हायस्कूलच्या विद्यार्थांचा जीवघेणा होडीप्रवास संपणार याच खुशीने दिली मुचकुंदी नदीला भेट. परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुचकुंदी तीरावरील "वडदहसोळ-गोळवशी" या ठिकाणी पूलप्रकल्पाच्या "भूमीपुजन" बातमीने सर्वात आनंदले असतील तर ते हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालकवर्ग!  पावसाळ्यात दुथड़ी भरून नदी प्रवाह विद्यार्थांच्या शिक्षणाला आणि पालकांच्या धास्तीचा मोठा प्रश्न उभा असायचा. वडदहसोळ-गोळवशी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून १७ ते १८ गाव जोडले जाऊन दळणवळणदृष्टया सुसज्ज होऊ शकतात.  शिवाय दोन्ही तालुक्यांच्या मुख्य् बाजारपेठा तुलनेने कमी अंतराने जवळच्या आहेत. पुढे गोळवशी-लांजा मार्गे वाहतूक वडदहसोळ पेंढखळे-रानतळे (राजापूर)मार्गे सुसज्ज झाल्यास परिसर हा पूर्णता विकासाच्या दिशेने झेपावताना आपल्याला नक्कीच मिळेल. दोन तालुके एकाच मतदार संघात असल्याने विकासाचा मुख्य केंद्रस्थानी हा परिसर असेल. त्यामुळे परिसरातील गावांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. दरम्यान उच्च शिक्षणास किंवा ग्रामस्थांना लांजा बाजरपेठेला जाण्यास हा पूलप्रकल्प अधिक लाभदायक ठरेल. रो...

लांजा ग्रामीण रुग्णालय येथे होणार आरोग्य सभा-18 जानेवारी 2020

Image
 चलो लांजा आरोग्य सभा - १८ जानेवारी ग्रामीण रुग्णालय लांजा दुपारी २:३० वाजता दिनांक १८ जानेवारी रोजी सन्माननिय खासदार विनायक राऊत साहेबांनी आयोजित केलेल्या आरोग्य सभेच्या निमित्ताने रत्नागिरीचे आमदार व उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब, स्थानिक आमदार राजन साळवी साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब साहेब आणि आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  तेव्हा सज्ज व्हा ! आपल्या मागण्या आणि गाऱ्हाणे पोहोचवण्यासाठी यापेक्षा वेगळी वा चांगली संधी आपल्याला यापुढे केव्हाही उपलब्ध होणार नाही. आपल्या समस्या आणि अडचणी आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी तमाम लांजा राजापूर वाशीयांनी या आरोग्य सभेला उपस्थित रहावे.  मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा- राजापूर

मुचकुंदी नदीवरील पुलाचे भूमिपूजन-18 जानेवारी 2020

Image
नमस्कार!🙏🏻 स्वप्नपूर्तीकडे संघटनेची वाटचाल आणि हाच तो कौतुकाचा क्षण भूमीपुजन कार्यक्रम पूलप्रकल्प: "वडदहसोळ - गोळवशी" शनिवार १८ जाने, २०२० दुपारी: १:०० वाजता परिसरातील तमाम जनतेचा, हितचिंतकानी दिलेला पाठिंबा तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून या आमच्या अथक पाठपुराव्यास घवघवीत यश!  मुचकुंदी शिलेदारांचा हा गौरवशाली कर्तुत्वाचा दिन! या शुभदिनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची कृपा करावी! धन्यवाद! मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा -राजापूर