Posts

Showing posts from 2022

मुचकुंदी परिसर विकास संघ तर्फे राजापूर,ओणी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन...

Image
―चला निर्माण करूया कोकण पॅटर्न... #MPVS संस्थेच्यावतीने ओणी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबीर;लांजा-राजापूर तालुक्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना  शैक्षणिक परिसंवादाचे आवाहन..... #रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३ #सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत  #श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय-ओणी, राजापूर  ✍🏻करियर म्हणजे काय...? योग्य करिअर कसे निवडू..? गोंधळून जाऊ नका.  याचसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग अंतर्गत "मार्गदर्शन आमचे, निवड तुमची” या संकल्पनेचा एक भाग म्हणून ग्रामीण स्तरावर रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत राजापूर तालुक्यातील "श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय, ओणी" येथे शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थी भविष्यातील करियरच्या विविध वाटा, त्यादृष्टीने आपली वाटचाल, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यातून आपली पुढील वाटचाल याविषयी जाणून आपल्या भविष्यातील करिअरमधील ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्या शाळेतील - महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थि...

लांजा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची वानवा,प्रशासन व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष..!

Image
― ग्रामीण स्तरावरील आरोग्यसुविधा पुरविणारे शासकीय ग्रामीण रुग्णालय आजारी; उपचारांभावी स्थानिकांचे आरोग्य  धोक्यात. ग्रामीण रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, असुविंधा तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुवे गावातील दोन जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू ही घटना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयावरील जनतेचा विश्वास कायमचाच उडवणारी.  दि. १० नोव्हेंबर, २०२२ रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास वारेशी कुटुंबियातील गर्भवती महिलेला शासकीय ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी उपचारांभावी आणि यंत्रणेतील असुविधांमुळे तसेच निर्णयातील दिरंगाईमुळे त्यांना अखेरीस पाचव्या दिवशी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास सांगितले गेले. अशातच १०८ रुग्णवाहिकेमध्येच दोन निष्पाप जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून झाल्याची बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवार दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुग्णालयातील अधिकारांची भेट घेतली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक श्री. सतीश ...

मुचकुंदी नदीवरील गोळवशी-वडदहसोळ पुलाच्या वाढीव निधीसाठी पाठपुरावा....

Image
मुचकुंदी नदीवरील पुलाच्या वाढीव निधीच्या मंजुरीकरिता एमपीव्हीएस संस्थेच्यावतीने  सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण साहेब यांना निवेदन सादर

मुचकुंदी परिसर विकास संघचा पाचवा वर्धापन दिन सोहळा २३ एप्रिल रोजी !

Image
मुचकुंदी परिसर विकास संघचा पाचवा वर्धापन दिन सोहळा २३ एप्रिल रोजी ! हे निमंत्रण एकजुटीचे, आपुलकीचे,  एकनिश्चयाचे आणि स्नेहसंमेलन सोहळ्याचे..! राजापूर प्रतिनिधी-   मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन सोहळा आणि स्नेहसंमेलन येत्या २३ एप्रिल 2022 रोजी मुचकुंदी नदी काठाजवळील श्री जाकादेवी मंदीर, वडदहसोळ गितयेवाडी मंदीर येथे होणार असून या निमीत्ताने विविध समाज उपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.          संघटनेमार्फत लांजा व राजापूर मधील ग्रामिण भागातील सामान्य माणसाला सक्षम व सुदृढ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात व जनतेचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर हि संस्था पाच वर्षा पासून आरोग्य, शिक्षण आणि सर्वागीण विकास मुद्यावर कामकरीत आहे.  संस्थे पाच वर्षात अनेक स्थानिक कामे पूर्ण केली आहेत त्यांची मांडणी जनतेसमोर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्या समोर मांडणार आहे.          शनिवार दि.२३ एप्रिल २०२२ रोजी स. १० ते दु...