मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा - राजापूर ® संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

नमस्कार!🙏🏻
रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबईतील " पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र, दादर (पूर्व) येथे *मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर ® संस्थेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कमी गणसंख्येच्या उपस्थिती मुळे सभा तहकूब करून ३० मिनिटांनी त्याच ठिकाणी सभा पुन्हा सुरू करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांनी या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले. 

सदरील सभेत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली.
• मागील सभेचे इतिवृत वाचन आणि संमत करणे.
• वार्षिक जमा खर्च अहवाल वाचन आणि संमत करणे.
• लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा - आरोग्य विषयक पुढील धोरण.
• नवीन कार्यकारणी निवड - स्वागत आणि मनोगत
• वार्षिक निधी संकलन - प्राथमिक नियोजन चर्चा

संस्थेच्या मागील सर्व साधारण सभेचे इतिवृत वाचन श्री. विनीत म्हादये यांनी केले. या संदर्भातील कृती अहवालाचे वाचन सचिव श्री. अजय मांडवकर यांनी केले. संस्थेचे सल्लागार श्री. रवींद्र मटकर यांनी यावर सूचना केल्या आणि श्री. महादेव हातणकर यांनी या इतिवृतास अनुमोदन दिले.

संस्थेच्या एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ च्या वार्षिक जमा खर्च अहवालाचे वाचन खजिनदार श्री. प्रकाश भगते यांनी केले. माजी सल्लागार श्री. विनोद चव्हाण यांनी यावर सूचना केल्या आणि श्री. रवींद्र मटकर यांनी या अहवालास अनुमोदन दिले.

नवीन कार्यकारिणी निवड समितीचे अध्यक्ष श्री विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सभागृहाच्या मान्यतेने नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा - आरोग्य विषयक पुढील धोरण या विषयावर सभेत उपस्थित सभासद यांच्या मार्फत सविस्तर चर्चा करण्यात आली.
#आरोग्य विषयक पुढील धोरण.
•नुतनीकरणातील लांजा ग्रा. रुग्णालय "उपजिल्हा" श्रेणीवर्धित करणे.
•विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मागणी.
•डॉक्टर, रुग्णालयीन कर्मचारी निवासस्थाने व्यवस्थापन निधीसाठी शासकीय पाठपुरावा
•सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजापूरमध्ये उभारण्याबाबत जोरकसपणे पाठपुरावा. 

पुढील ५ वर्षात संस्थेकडून लांजा-राजापूर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयीन सुविधांच्या बळकटीकरणसाठी भरीव कामगिरी होईल असा विश्वास आहे. स्थानिकांना सरकारी रुग्णालयीन सेवेचा उत्तमरीत्या लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध राहुन आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार या अंगांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे मूळ उद्दिष्ट असेल. एकनिश्चयी एकजुटीच्या विचारांनी जनहिताची कामे हाती घेत संस्थेचे आदर्शवत कार्यातून सामाजिक ऋणानुबंध जोपासू. ते करीत असताना संस्थेची मूळ मूल्य जपुन तळागाळातील अवघ्यांमध्ये आपलेपण, बंधुभाव आणि समतेच्या विचारांवर संस्थेचे कार्यअधिक बहारदार करण्याचे ध्येय असेल.

#आपली संस्था, आपला परिवार!

नवनिर्वाचित कार्यकारिणी:
(कार्यकाळ ५ वर्षे - सन: २०२५ ते २०३०)

अध्यक्ष: श्री. अजय तुकाराम मांडवकर (वडदहसोळ)
सचिव: श्री. बलराम दाजी तांबे (निवोशी)
खजिनदार: श्री.स्वप्नील गणपत मिरजोळकर (वडदहसोळ) 

उपाध्यक्ष: श्री. सुजय लक्ष्मण गितये (कळसवली)
उपाध्यक्ष: श्री. रविंद्र भानू गितये (वडदहसोळ)

सहसचिव: श्री. महादेव झिलू हातणकर (वडदहसोळ)
सहसचिव: कु. विनीत विष्णू म्हादये (वडदहसोळ)
सहसचिव: ज्ञानेश सुरेश बागवे (सडवली)

सहखजिनदार: श्री. अमर रमेश गोरूळे (खावडी)
हिशोब तपासनीस: श्री. सत्यवान गंगाराम मांडवकर (सडवली)

#सल्लागार:
•श्री. रविंद्र बाळू मटकर (चुनाकोळवण)
•श्री. विनोद चव्हाण (कळसवली)

*#पाठपुरावा टीम:*
•प्रमुख - श्री. अमोल विठ्ठल पळसमकर (वडदहसोळ)
•श्री. सुभाष सुरेश तांबे (निवोशी) - कार्यकारिणी सदस्य
•विनोद चव्हाण (कळसवली)
•श्री. विजय तुकाराम भगते (इंदवटी)
•श्री. महादेव झिलू हातणकर (वडदहसोळ) - कार्यकारिणी सदस्य

#शैक्षणिक टीम
•प्रमुख - श्री. वैभव सिताराम भगते (इंदवटी)
•सह - श्री. सचिन जनार्दन गोठणकर (शिवणे बु.)

#सभासद संघटन टीम:
•प्रमुख - श्री. तानाजी भिवाजी तळेकर (कळसवली) - कार्यकारिणी सदस्य
•श्री. संदीप रामचंद्र कांबळे (सडवली) - कार्यकारिणी सदस्य
•श्री. राजेश जयवंत राघव (चुनाकोळवण) - कार्यकारिणी सदस्य

#मुंबई तालुका संपर्क प्रमुख:
•श्री सुरेश काना गितये (वडदहसोळ) - राजापूर
•कु. किरण प्रकाश भालेकर (गोळवशी) - लांजा

#सांस्कृतिक टीम:
•प्रमुख - श्री. अजय तुकाराम भगते (इंदवटी)
•सह- श्री. शशिकांत मांडवे (निवोशी)

#आय.टी टीम:
•श्री. विजय चौगुले (खरवते)
•श्री. नित्यानंद मधुकर घाडीगांवकर (खावडी)
•श्री. सुनील गुणाजी मिरजोळकर (वडदहसोळ)
•श्री. रोहण हेमंत डोंगरकर (खिनगिणी)

_धरू एकात्मतेची कास, करू परिसराचा विकास!🌿_
जय मुचकुंदी!✊🏻

नवनिर्वाचित मध्यवर्ती कार्यकारिणी पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्य, टीम सहकारी यांचे मनस्वी अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी "मुचकुंदीमय शुभेच्छा!💐

आपले नम्र,
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर (रजि.)
www.mpvs.co.in
Email: muchkundipvs@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"