Posts

Showing posts with the label Lanja

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

Image
―८ वा वर्धापन दिन सोहळा ―गोळवशी-वडदहसोळ पूलप्रकल्प लोकार्पण सोहळा #आग्रहाचे निमंत्रण!🌹 हे निमंत्रण एकजुटीचे🤝 हे निमंत्रण आपुलकीचे❣️ हे निमंत्रण एकनिश्चयाचे✊🏻 हे निमंत्रण स्नेहसंमेलन सोहळ्याचे...🌹 मुचकुंदी नदीवर बहुप्रतिक्षित लांजा राजापूर दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या "स्वप्नपूर्ती गोळवशी-वडदहसोळ" पूलाचा लोकार्पण सोहळा* आणि एमपीव्हीएस संघटनेचा ८वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१७ मे, २०२५ रोजी दु. ३ते रात्रौ ११:०० वाजता श्री. जाकादेवी मंदिर, वडदहसोळ ता. राजापूर* याठिकाणी आयोजित करण्यात येत असून सदर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. धन्यवाद! #आपली संस्था, आपला परिवार!😊 स्वागतोत्सुक,🙏🏻 #मुचकुंदी परिवार, #मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर (रजि.)

लांजा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची वानवा,प्रशासन व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष..!

Image
― ग्रामीण स्तरावरील आरोग्यसुविधा पुरविणारे शासकीय ग्रामीण रुग्णालय आजारी; उपचारांभावी स्थानिकांचे आरोग्य  धोक्यात. ग्रामीण रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, असुविंधा तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुवे गावातील दोन जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू ही घटना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयावरील जनतेचा विश्वास कायमचाच उडवणारी.  दि. १० नोव्हेंबर, २०२२ रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास वारेशी कुटुंबियातील गर्भवती महिलेला शासकीय ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी उपचारांभावी आणि यंत्रणेतील असुविधांमुळे तसेच निर्णयातील दिरंगाईमुळे त्यांना अखेरीस पाचव्या दिवशी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास सांगितले गेले. अशातच १०८ रुग्णवाहिकेमध्येच दोन निष्पाप जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून झाल्याची बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवार दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुग्णालयातील अधिकारांची भेट घेतली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक श्री. सतीश ...

लोकप्रतिनिधीशी पुलासंदर्भात यशस्वी बैठक..

Image
स.न.वि.वि.🙏🏻🙏🏻💐 आभार! आभार! आभार! रविवार, ११ फेब्रु, २०१८ *#सभावृत्तांत* संघ्याच्यावतीने आयोजित बैठकीस उपस्तिथ खासदार साहेब, आमदार साहेब, रत्नागिरी जिल्हा शिक्षण सभापती, र...