Posts

Showing posts with the label MPVS

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

Image
मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा - राजापूर ® संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. नमस्कार!🙏🏻 रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबईतील " पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र, दादर (पूर्व) येथे *मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर ® संस्थेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कमी गणसंख्येच्या उपस्थिती मुळे सभा तहकूब करून ३० मिनिटांनी त्याच ठिकाणी सभा पुन्हा सुरू करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांनी या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले.  सदरील सभेत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. • मागील सभेचे इतिवृत वाचन आणि संमत करणे. • वार्षिक जमा खर्च अहवाल वाचन आणि संमत करणे. • लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा - आरोग्य विषयक पुढील धोरण. • नवीन कार्यकारणी निवड - स्वागत आणि मनोगत • वार्षिक निधी संकलन - प्राथमिक नियोजन चर्चा संस्थेच्या मागील सर्व साधारण सभेचे इतिवृत वाचन श्री. विनीत म्हादये यांनी केले. या संदर्भातील कृती अहवालाचे वाचन सचिव श्री. अजय मांडवकर यांनी केले. संस्थेचे सल्ला...

एमपीव्हीएस ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत रक्तदान शिबिर🩸लांजा येथे संपन्न....

Image
एमपीव्हीएस ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत रक्तदान शिबिर🩸 लांजा येथे संपन्न; ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मुचकुंदी नदीवरील (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ...

Image
महत्वाकांक्षी (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ अखेर भुमीपूजनानंतर लगेचच (वडदहसोळ-गोळवशी) महत्वाकांक्षी स्वप्नपूर्ती पूलाच्या कामास १ मार्च २०२० रोजी प्रारंभ झाला त्यावेळचे हे क्षणचित्र. "मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर" या सामाजिकसंघटनेने परिसरातील संलग्न ग्रामपंचायत, गावकरी ग्रामस्थांच्या आणि MPVS शिलेदारांच्या साथीने प्रलंबित पूलाची मागणी अथक पाठपुराव्याने मार्गी लावण्यात यश आले..  दरम्यान विकासकामांचा पाठपुरावा* करताना तालुकावासियांनी वेगवेगळ्या स्तरातून हितचिंतक म्हणून पाठीशी राहिले. त्यामुळे यापुढे आरोग्य विषयाचा पाठपुरावा व्हावा यासाठी सर्वांच्याच् अपेक्षा उंचावल्या आहेत. 📸फोटोग्राफी सौजन्य: श्री गणेश खानविलकर―उपाध्यक्ष मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

MPVS क्रिकेट लीग - २०१८ (पर्व दुसरे) जल्लोषात संपन्न...

Image
*मुंबई उपनगरात MPVS क्रिकेट लीग - २०१८ (पर्व दूसरे) मुचकुंदीमय जल्लोषात सोहळ्यात संपन्न.* मित्रहो, स.न.वि.वि.!🙏🏻 🏏मुंबई उपनगरात प्रथमच *मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) मुंबई रजि.* संलग्न *MPVS क्रिकेट समिती* च्या नेतृत्वाखाली  दिंडोशी विभागातील तानाजी नगर "गणेश मैदान" येथे 🏆 शनिवार दि. २४ मार्च ते रविवार दि. २५ मार्च, २०१८*_ रोजी आयोजित MPVS क्रिकेट लीग २०१८ - (पर्व दूसरे) दिवस - रात्र अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न. 🏆MPVS क्रिकेट समितीच्यावतीने स्पर्धेचे अप्रतिम असे नियोजन करण्यात आले.  मुंबई उपनगर व मर्यादीत रत्नागिरी जिल्हा (लांजा-राजापुर) तालुक्यातील तब्बल ३२ संघानी या स्पर्धेत सहभाग दर्शविला. मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर्यन मालाड आणि निवोशी वॉरिअर्स - अ (लांजा) संघाने मजल मारली. अखेर निर्णायक सामन्यात निवोशी वॉरिअर्स अ संघाला पराभूत करण्यात आर्यन मालाड या संघाला यश प्राप्त झाले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावून विराजमान झाले.  📜सन्मानीय माजी महापौर, आमदार श्री. सुनील प्रभु साहेब (दिंडोशी विधानसभा मतदार संघ) आणि मान. श्री. सुन...