MPVS क्रिकेट लीग - २०१८ (पर्व दुसरे) जल्लोषात संपन्न...
*मुंबई उपनगरात MPVS क्रिकेट लीग - २०१८ (पर्व दूसरे) मुचकुंदीमय जल्लोषात सोहळ्यात संपन्न.*
मित्रहो,
स.न.वि.वि.!🙏🏻
🏏मुंबई उपनगरात प्रथमच *मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) मुंबई रजि.* संलग्न *MPVS क्रिकेट समिती* च्या नेतृत्वाखाली दिंडोशी विभागातील तानाजी नगर "गणेश मैदान" येथे 🏆 शनिवार दि. २४ मार्च ते रविवार दि. २५ मार्च, २०१८*_ रोजी आयोजित MPVS क्रिकेट लीग २०१८ - (पर्व दूसरे) दिवस - रात्र अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न.
🏆MPVS क्रिकेट समितीच्यावतीने स्पर्धेचे अप्रतिम असे नियोजन करण्यात आले.
मुंबई उपनगर व मर्यादीत रत्नागिरी जिल्हा (लांजा-राजापुर) तालुक्यातील तब्बल ३२ संघानी या स्पर्धेत सहभाग दर्शविला. मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आर्यन मालाड आणि निवोशी वॉरिअर्स - अ (लांजा) संघाने मजल मारली. अखेर निर्णायक सामन्यात निवोशी वॉरिअर्स अ संघाला पराभूत करण्यात आर्यन मालाड या संघाला यश प्राप्त झाले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावून विराजमान झाले.
📜सन्मानीय माजी महापौर, आमदार श्री. सुनील प्रभु साहेब (दिंडोशी विधानसभा मतदार संघ) आणि मान. श्री. सुनील गुजर साहेब (माजी नगरसेवक-शिवसेना शाखा क्र. ३६) आणि संघाध्यक्ष श्री. विजय भगते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना शाखा क्र. ३६ चे कार्यकारी पदाधिकारी, तरुण भारत पत्रकार कविता नागवेकर, संघाचे सल्लागार श्री. रवीन्द्र मटकर, तानाजी तळेकर, सोबत सचिव श्री. गणेश खानविलकर, उपाध्यक्ष श्री. सुभाष तांबे, सहसचिव श्री. सुरेश गितये, खजिनदार श्री. राजेश राघव, उपखजिनदार महेश मांडवकर, क्रीडा प्रमुख संदीप म्हादये, अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ (शाखा मालाड-कांदिवली) अध्यक्ष श्री. बळीराम कामतेकर, सचिव कोत्रे साहेब, कार्यध्यक्ष .., युवासेना उपशाखा अधिकारी श्री. सचिन भुवड, तसेच युवामोर्चा महामंत्री, भाजपा अक्षय घाग आदि उपस्तिथ जन होते.
💐उपस्तिथ मान्यवरांचे MPVS तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संघाध्याक्षानी सर्व मान्यवर यांचे आभार व्यक्त करून सर्व स्पर्धकाना पुढील वाटचालीस मुचकुंदीमय शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालनाचा भार क्रीड़ा प्रमुख अजय मांडवकर, समन्वयक सुजय गितये यांनी संभाळला.
👆स्पर्धेच्या नियोजनाची संकल्पना क्रिकेट समिती अध्यक्ष सत्यवान मांडवकर, दशरथ तांबे, प्रशांत तांबे, सोबत योगेश म्हादये, बलराम तांबे, सचिन गोठनकर यांनी उत्तमप्रकारे संभाळली. स्पर्धेला मुचकुंदी परिवारातील रोजगार संघटक रवीन्द्र गितये, प्रकाश भगते, तेजस तांबे, शैक्षणिक संघटक विजय चौगुले, फेसबुक समन्वयक किरण भालेकर, आरोग्य संघटक प्रशांत जोगळे तसेच MPVS सदस्य प्रकाश गितये, विलास म्हादये, संतोष म्हादयेे, सन्देश भगते, अजय भगते, आकाश पळसमकर, दिनेश मिरजोळकर, नरेश आमटे, मनोज गोंडाळ, अमोल तांबे, बंटी तांबे, प्रकाश जोगळे आदींचे विशेष सहाय्य लाभले.
---------------------------------------------------
*विजयाचे शिल्पकार*
=========================
🏆 *विजेता संघ* ― आर्यन मालाड
🏆 *उपविजेता संघ* ― निवोशी वॉरिअर्स (अ)
*🏏मालिकावीर* ― प्रशांत तांबे (निवोशी वॉरिअर्स -अ)
*🏏उत्कृष्ट फलंदाज* ― विकास (आर्यन मालाड)
*🏏उत्कृष्ट गोलंदाज* ― प्रीतम तांबे (निवोशी वॉरिअर्स-अ)
*🏏उत्कृष्ट क्षेत्ररक्षक* ― रूपेश सावंत (संघ
*🎽सर्वोत्तम ड्रेसिंग* ― निवोशी वॉरिअर्स - ब
*⚜शिस्तबद्ध संघ* ― आदिष्टी संघ, वाकेड
*प्रेक्षणीय सामना:-*
विजेता ― साई सिद्धी मित्र मंडळ
उपविजेता ― साई कृपा मित्र मंडळ
🤝🏻स्पर्धेत सहभागी सर्व संघाचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
धन्यवाद!👏🏻
*―⚜मुचकुंदी परिसर विकास संघ ⚜*
Comments
Post a Comment