एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"
रक्तदान हेच श्रेष्ठ दान!
रक्तदान हेच श्रेष्ठ दान; रक्तदान मोहिमेतून एमपीव्हीएस जपत आहे रक्ताचं नातं!
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर ही सामाजिक संस्था जात - पात - धर्म न मानता तसेच राजकारण विरहित असे सर्वसमावेशक "आपण आपल्यासाठी बनविलेले संघटन" असून मागील सात वर्षे लांजा - राजापूर तालुकास्तरावर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक ऋणानुबंध जपत आहे. तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्यादृष्टीने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटन आदी मूलभूत सुविधा बळकटीकरणासाठी संस्था सक्रियपणे कार्यरत आहे. ग्रामीण स्तरावर "आरोग्य" ही बाब अतिसंवेदशील असून संस्थेच्यावतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधत दरवर्षी ग्रामीण स्तरावर 'आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर’ उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे यावेळी लांजा येथे ग्रामीण टीम (लांजा - राजापूर) अंतर्गत रविवार ८ ऑक्टोबर, २०२३ रोजी "श्री. स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटल, लांजा" याठिकाणी ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत सकाळी ०९ ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत "भव्य रक्तदान शिबीर" आयोजन केले आहे.
राज्यभर तसेच जिल्हा रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्त पिशव्यांची कमतरता असल्याची नेहमीचीच समस्या असते. त्यासाठी शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. लांजा- राजापूर तालुक्यातील शासकीय ग्रा. रुग्णालये सह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढ्याची कमतरता भासते. रस्ते - महामार्गावरील वाढलेले अपघात तसेच ग्रामीण भागातील स्थानकांवरील उपचारांभावी अनेक वेळा रक्तसाठ्यांभावी वाईट प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे जनसामान्यांची गरज म्हणून एमपीव्हीएस संस्थेने मागील सहा वर्षे रक्तदान शिबीराचे आयोजन करीत समाजऋणाचे कार्य केले आहे.
मनुष्यास उपयुक्त रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते ते कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही आणि म्हणूनच "रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान!" म्हणून मानले जाते. समाजऋण फेडण्याची हि एक संधी रक्तदानामुळे मिळते आणि या दानाचे पुण्य कमविण्यासाठी एमपीव्हीएस या लोकप्रिय संस्थेने केलेल्या रक्तदान शिबिराच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय रत्नागिरी तील डॉक्टर्स वर्ग यांच्या सहयोगातून हे शिबीर आयोजन होत आहे. मान. डॉ. श्री. सुहास खानविलकर यांनी स्वामी समर्थ हॉस्पिटल, लांजा हे शिबिरासाठी उपलब्ध करून विशेष सहकार्य केले आहे. शिबीर सर्वोत्तम व्हावे यासाठी संस्थेची आय.टी. टीम (मुंबई) समाजमाध्यमातुन आणि ग्रामीण नियोजन टीम मागील महिनाभर स्थानिक पातळीवर रक्तदानासंदर्भात जनजागृती केली. लांजा - राजापूर तालुकाभरातुन जवळ - जवळ ७५ ते ९० रक्तदात्यांनी आपल्या नावांची नोंद केली आहे. त्याचबरोबर सदर शिबीराचे नियोजन दर्जेदार आणि उत्तमपणे व्हावे यासाठी संस्थेतील सदस्य-सदस्या, हितचिंतक यांनी आपला दातृत्व सेवा-भाव वृद्धिंगत करीत संस्थेला देणगी स्वरूपात हातभार केला. सर्व देणगी दात्यांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले आहे.
#रक्तदान शिबिर 2023🩸
#श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, लांजा
#रविवार ८ ऑक्टो, २०२३
#वेळ: सकाळी ०९: ते ०१:०० वा.
आपले स्नेहांकित,
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर (रजि.)
संलग्न, ग्रामीण टीम (लांजा - राजापूर)
Visit us: www.mpvs.co.in | Email - muchkundipvs@gmail.com

Comments
Post a Comment