लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नुतन इमारतीच्या कामाला मुहूर्त कधी...?

―इमारतीच्या बांधकामाला सुरुवात कधी होणार ??

लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या उदघाटनाचा मुहूर्त प्रदीर्घ काळानंतर उद्या सकाळी ठीक  १०:०० वाजता. 

दरम्यान श्रेयवादाच्या भोवऱ्यात गुंतून न जाता एमपीव्हीएस संस्थेच्या मागण्यांची सविस्तर बाब कळणे गरजेचे. जिल्हा शासनासह आरोग्य प्रशासनाला एपीव्हीएसचा ईशारा. याआधी कित्येक वेळा पुरेसे मनुष्यबळ, यंत्रणा यावर पत्रव्यवहार, पाठपुरावा झाला.जनतेची हाक प्रशासनापर्यत पोहचली तरी शासनाची मनोधारणा होत नाही व त्यावर पुढे कार्यवाही होत नाही. ही वस्तुस्थिती आजही आढळते.

संस्थेने लांजा आणि राजापूर ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा बळकटीसाठी केलेल्या अधिकतम मागण्यांचे लवकरच जिल्हा शल्यचिकित्सक -  अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण हवे. नसल्यास जनतेचा रोष कायमच राहणार.. 

संस्थेने अनेक वेळा यासाठी पाठपुरावा केला. लांजा रुग्णालय जागा हस्तांतरण बरोबरच अनेक बाबी यांचा पर्दाफाश केला. रुग्णालयांना भेट देत, अभ्यास दौऱ्यातून माहिती गोळा करत भव्य आरोग्य सभांचे आयोजन झाले. आणि पुढे जे झाले ते अवघ्या लांजा राजापूर वासियांनी पाहिले. खऱ्या अर्थाने शासन प्रशासन लांजा-राजापूरच्या आरोग्याकडे लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी "मुचकुंदी परिसर विकास संघ" या संस्थेने पुढाकार घेतला.

●ग्रा. लांजा-राजापूर रुग्णालयात बाळंतपण सुरक्षित आहे, अद्यायवत यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्ध आहे का?
●ग्रामीण रुग्णालयीन क्षमतेनुसार विविध संवर्गातील रिक्त पदांची पूर्तता झालीय? वैद्यकीय अधीक्षक, प्रवर्गनुसार तज्ञ पुरेसे आहेत का?
●प्रतिबंधात्मक लसी, मुबलक औषधे, आयसीयु बेड?
●रुग्ण सुरक्षा म्हणून CCTV तरी आहेत का?
●वैद्यकीय अधिकारी यांना निवारा शेड आहेत?

#मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर®

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"