Posts

संघाची सविस्तर माहिती

Image
संघटनेची_माहिती:- सुरुवात - सोशिअल मीडियाद्वारे    दि. २७ सप्टेंबर, २०१६ या दिवशी सोशिअल मीडिया (व्हाट्सअप) माध्यमातून मुचकुंदी नदीवर पूल व्हावा ही लोकांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जावो, कारण त्यामुळे शाळकरी मुलाना शाळेत जाणे, दळणवळण सोईस्कर आणि लांजा - राजापुर बाजारपेठा बारमाही जोडल्या जाव्यात या उद्देशाने मुचकुंदी नदी परिसर या नावाचा व्हाट्सअप ग्रुप हा संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. विजय भगते यांच्या कल्पनेतुन बनविला गेला. या सुंदर संकल्पनेला तरुणांनी चांगला पाठिंबा देत पुढे रविवार दि. १६ ऑक्टो, २०१६ रोजी माटुंगा, पाच उद्यान, मुंबई येथे ★ ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते श्री. जाकादेवी मंदीर (वडदहसोळ) दरम्यान प्रलंबित " पूलबांधणी "  व्हावी याकरिता "मुचकुंदी परिसर विकास संघ" लांजा - राजापुर  या संघटनेची स्थापना करण्यात आली. तात्पुरत्या कार्यकारिणी संघाची सुरुवात झाली. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी लांजा राजापुर तालुक्यातील तमाम जवळ जवळ १०० ते १२५ लोकांच्या उपस्तिथित कायस्वरूपी कार्यकरिणी निवड करून विकासकामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली...