संघाची सविस्तर माहिती
संघटनेची_माहिती:-
सुरुवात - सोशिअल मीडियाद्वारे
दि. २७ सप्टेंबर, २०१६ या दिवशी सोशिअल मीडिया (व्हाट्सअप) माध्यमातून मुचकुंदी नदीवर पूल व्हावा ही लोकांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जावो, कारण त्यामुळे शाळकरी मुलाना शाळेत जाणे, दळणवळण सोईस्कर आणि लांजा - राजापुर बाजारपेठा बारमाही जोडल्या जाव्यात या उद्देशाने मुचकुंदी नदी परिसर या नावाचा व्हाट्सअप ग्रुप हा संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. विजय भगते यांच्या कल्पनेतुन बनविला गेला.
या सुंदर संकल्पनेला तरुणांनी चांगला पाठिंबा देत पुढे रविवार दि. १६ ऑक्टो, २०१६ रोजी माटुंगा, पाच उद्यान, मुंबई येथे ★ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते श्री. जाकादेवी मंदीर (वडदहसोळ) दरम्यान प्रलंबित "पूलबांधणी" व्हावी याकरिता "मुचकुंदी परिसर विकास संघ" लांजा - राजापुर या संघटनेची स्थापना करण्यात आली. तात्पुरत्या कार्यकारिणी संघाची सुरुवात झाली. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी लांजा राजापुर तालुक्यातील तमाम जवळ जवळ १०० ते १२५ लोकांच्या उपस्तिथित कायस्वरूपी कार्यकरिणी निवड करून विकासकामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
| संघाची उभारणी करण्यास पहिली बैठक "पाच उद्यान - माटुंगा" |
बऱ्याच वर्षापासूनची पूलाची आवश्यकता आणि पूलाच्या अनुषंगाने दोन तालुके कायम स्वरूपी जोडले जातील, विकासाला भरभरुन वाटचाल होण्यास लाभ होईल, अशी विचारधारना अंगीकरून परिसराच्या सर्वांगीण विकासात्मक कामाकरिता विविध उपक्रम राबवून जनजागृती पर कार्यक्रम राबविले जावेत, यासाठी उपाययोजना व प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पुढील_वाटचाल:-
★संघाचे ब्रीद सांगून लोकांना उत्स्फूर्त प्रोत्साहन द्यावे म्हणून प्रथमच दि. २५ डिसेंबर,२०१६ रोजी कौटुंबिक स्नेहसंम्मेलन राबवून संघाचे आवाहन सादर केले गेले आणि प्राथमिक कामकाज आणि निधी संकलन करण्यात आले. त्यातून लोकांचा भरघोस पाठिंबा मिळाला आणि तरुणांना अनेकांची साथ लाभली.★विकास हा खरा ग्रामिण स्तरावर करायचा आहे, तर मग संघाच्यावतीने योग्य घडी आणि स्थानिकांचा आशीर्वाद करिता वडदहसोळ (जाकादेवी मंदीर) येथे दि. १२ फेब्रु, २०१७ रोजी जाहीर सभा ठेवण्यात आली. त्यात तर लोकांनी ६५० ते ७०० च्या आकडयात हजेरी लावली.
★ क्रीडा क्षेत्रात तरुण खेळाडूना प्रोत्साहन म्हणून १२ मे व १३ मे २०१७ ला मुचकुंदी परिसरातील ३२ संघाची MPVS क्रिकेट लीग संपन्न.

★विकासपर्वाची मोहीम पुढे संघाचे संस्थापक/अध्यक्ष श्री. विजय भगते सह पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्य यांच्या सहाय्याने गावोगावी भेट देऊन संघटन आणि एकीचे महत्त्व पटवून दिले आणि विकासात्मक कामात लोकांकडून समस्या जाणून घेऊन कायम त्या पूर्ण करण्यास प्रयत्नशीर. ग्रामस्थांच्या आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीची योजनाबद्व आखनी.
★) शहरात आल्यावर खेड्यातील तरुणांसमोर मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे *रोजगार* त्यासाठी घरगुती बनविलेली सुगंधी अगरबत्ती आणि फणासाचे तळलेले गरे माफक दरात आपल्याच रोजगार संघटकाकडून आपल्याच परिसरात विक्री करून रोजगार प्राप्ती करण्यास मदत झाली.
★मुचकुंदी नदीवर पूल बांधणी "गोळवशी ते वडदहसोळ" या मध्यवर्ती गावा दरम्यान होऊन संबध परिसर पुलाच्या अनुषंगाने जोडला जाऊन अधिक जिव्हाळा निर्माण व्हावा. तसेच शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बाजारपेठ यासाठी लांजा - राजापुर या दोन तालुक्यांची जोड हीच आपल्या परिसरातील गावांच्या विकासकामाला गतिमान करणारी ठरणारी आहे. हे लक्षात घेता प्रस्ताविक दोन गावांची एकत्रित बैठक 'धावगी मैदान' येथे संपन्न.
★आपल्या गावाशी जोडलेली आपली नाळ आणि जन्मभूमीचा विकास या भावनेने संघाच्या पदाधिकारी यांनी प्रास्ताविक पूल बांधणीस पत्रव्यवहारद्वारा, ईमेल, आणि भेटी घेऊन रीतसर शासकीय यंत्रणेचा पाठपुरावा केला. नियोजनबद्ध करण्यात आला.

★शिवाय सर्वांगीण विकासकरिता लांजा व राजापुर बाजारपेठला जोडणाऱ्या दोन रस्त्यांच्या मजबूती आणि डांबरीकरणाचे प्रस्ताव लोकप्रतिनिधी यांना सादर करण्यात येऊन पाठपुरावा चालू आहे.
★हा.. हा.. म्हणता संघाची नावलौकिकता लोकसत्ता कोकण आवृत्ती / सकाळ /प्रहारसारख्या मोठ्या वर्तमानपत्रातुन रेखाटली जावु लागली. हे सारे नियोजन आयोजन करण्याकरिता संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १० महिन्याच्या काळावधीत खुप पण मनापासून कामगिरी करून सर्व कार्यक्रम यशस्वी केले. यात सर्व गावातील ग्रामस्थांचा आशेचा किरण आता लवकरच मुचकुंदी नदीवर पूल होऊन प्रकाशीत होणार आहे....
★दि. १ ऑक्टो, २०१७ रोजी जि.प.पू.प्रा. शाळा कोंडये शाळा नं. १ येथे मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) मुंबई रजि. आणि श्री. दत्तसेवा ट्रस्ट, पेंडखळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डेरवण, वालावलकर रुग्नालयातील नामवंत वैद्यकीय तज्ञ यांच्या सहाय्याने आरोग्य शिबीर संपन्न.
★गावात असलेल्या नेटवर्कच्या सुव्यवस्थेला कायमस्वरुपीय यंत्रनेत परिवर्तन व्हावे यासाठी संघाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले संघाध्यक्ष श्री. विजय भगते व सेवानिवॄत्त सैनिक श्री. सुरेश तांबे.
★सन २०१७ मधील अखेरचा आणि अतिशय प्रेरणादायी उपक्रम म्हणजे माद्यमिक विद्यालयीन मुलांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर दि. जानेवारी २०१८ रोजी राजापुर तालुक्यातील ओणी येथे राबविण्याचा संकल्प.
धरु एकात्मेची कास, करू परिसराचा विकास!
माहिती संकलन✍
अजय मांडवकर | सहसचिव, समन्वयक
मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) मुंबई


































Keep it up
ReplyDelete