परेल येथे महत्वपूर्ण सभा,



. . वि. वि.!

उपरोक्त संघटनेच्यावतीने आपणांस कळविण्यात येते आहे की, रविवार दि. १५ ऑक्टो, २०१७ रोजी, "सोशिअल सर्विस लीग" परेल येथे सायं. ठीक ते वाजता  "महत्वपूर्ण सभेचे" आयोजन करण्यात आले आहे. आपल्या गावच्या मातीशी जडलेली नाल आणि जिथे आपण जन्माला आलो त्या जन्म्भुमीचा विकास व्हावा अशी सर्वांचीच मनभावना असते. प्रथमच आपल्या परिसरात विकासात्मक दृष्टीने संकल्पित विचार करणारे व्यासपीठ निर्माण होऊन आपण सर्व एकत्र येऊन संघाच्या छत्राखाली संघटीत झालेले आहोत.

परिसराचा विकास व्हावा याकरिता आपल्या सहकाराबरोबर आपले विचार प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे व्यासपीठ लाभले आहे. जर परिवर्तन घडवायचे असेल, तर आपल्यातील असणाऱ्या प्रबोधनकारी विचारांना जागे केलेच पाहिजे. बदल स्वतःपासून करायला हवापरिवर्तन हे शक्य आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही आम्ही एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण करूतेव्हा? वेळ आलेली आहेचांगलं काही करून दाखवण्याची. तर मग विचारांची जडण घडण करू, आणि संघटीत होऊ!
तरी या आयोजित सभेला 'कार्यकारिणी पदाधिकारी, संघटककार्यकारी सदस्य सदस्य  यांनी वेळेत हजर राहून नवीन योजना, संकल्पना आणि आपले मत मांडावीत. जेनेकरून संघाच्या विकासपर्वाचा आपण एक सक्रिय भाग व्हावे!




धरू एकात्मेची कास, करू परिसराचा विकास !


विषय:-
१] सभासद नोंदणी करून घेणे
२] वेब साईटचे नियोजन
३] क्रिकेट टीम नियोजन
४] रोजगार नियोजन
५] करिअर मार्गदर्शन नियोजन
६] ग्रामीण कार्यालय निर्मितीकरण
७] पुढील धोरण
८] आरोग्य शिबीर व आयडी खर्च



आपले स्नेहांकित,
मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा - राजापुर) 




Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"