नाबार्ड यादीत मुचकुंदी नदीवरील प्रलंबित पूल आता मार्गी लागणार....

मित्रहो,


अत्यंत गोड बातमी  ........ नाबार्ड यादीत  "मुचकुंदी नदीवर ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते जाकादेवी मंदिर (वडदहसोळ)" दरम्यान पूलबांधणी काम अधोरेकीत केले गेले आहे. जे ३० वर्षे जमले नाही ते मुचकुंदी परिसर विकास संघाच्या संघटन या संकल्पनेतून आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून प्रलंबित पूल आता मार्गी लागणार.....   

लवकरच साऱ्यांचे स्वप्न साकार होणार...... 

लांजा व राजापुर या दोन तालुक्यांच्या सीमेवरून मुचकुंदी नदी प्रवाहित आहे. पावसात ही नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे दोन्ही तालुक्यातील गांवचा एकमेकांशी संपर्क तुटला जातो तसेच वडदहसोळ गावांत असलेल्या हायस्कुलला शिक्षण घ्यावयास जाणाऱ्या गोळवशी गावातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, कधी कधी ही मुले जीवघेणा होडीप्रवास करून माध्यमिक शिक्षण घ्यावयास जातात. त्यामुळे येथील तरुण पर्यायाने शहरात स्थलांतर करतात आणि चांगली चांगली हुशार मुले आपल्या भविष्याचा खेळ खंडबो करून बसतात कारण शहरातील शिक्षण सर्वसामान्य मुलांना परवडणारे नसते, राहण्याची सोय नसते. योग्य मार्गदर्शन नसते आणि पुढील जीवन नोकरदारीत  व्यस्त करतात.  या नदीप्रवाशी पार्श्वभूमीवर मुली  तर अजूनही चूल आणि मूल यातच आहेत. का तर त्रांत्रिक किंवा उच्च शिक्षण घेण्यास लांजा रत्नागिरीसारख्या शहरात शिक्षण घेण्यास मचकुंदी नदीवर पूल महत्वपूर्ण दुवा ठरेल.     

शिवाय लांजा व राजापूर बाजारपेठना जाण्यास आणि गावात प्राथमिक आरोग्य सेवा नसल्याने किंवा अपुऱ्या वैद्यकीय असुविधांमुळे सामान्य जनतेस सतत हॉस्पिटलला जाण्यास दळणवळणाचा मोठा त्रास होतो. परिणामी आपला जीव गमवावा देखील लागत आहे.  

म्हणूच हे सर्व कुठेतरी थांबावे आणि सुरळीत जीवन व्हावे असे अनेकांच्या मनात होते. परंतु प्रत्यक्षात करणार कोण? तर फक्त संघटन!!! मग याच संकल्पनेला जागून लांजा - राजापुर मधील तरुणांनी एकत्र येऊन मुचकुंदी परिसर विकास संघाची स्थापणा केली.  रविवार दि . १६ ऑक्टो, २०१६ रोजी माटुंगा पाच उद्यान येथे तात्पुरती कार्यकारिणी स्थापण करून संघाची विकास कामाला सुरुवात केली. आणि हा हा म्हणता सोशियल मीडियाच्या (व्हाट्सअप, फेसबुक .....  साहाय्याने लोकांपर्यंत पोहचून त्याचे पडसाद ६ नोव्हे, २०१६ रोजी परेल, आर्यभट्ट येथे  सव्वाशे लोकांच्या उपस्तिथीत संघाची कायम स्वरूपी कार्यकारिणी उभारली आणि खऱ्या अर्थाने विकास कामाला सुरवात केली. 

संघाचे पहिले लक्ष्य म्हणजे मुचकुंदी नदीवरील पूल प्रकल्प मार्गी लावून हे बहुप्रतिष्टीत काम करून स्थानिक जनतेला दिलासा मिळावा. म्हणून संस्थापक व संघाध्यक्ष श्री. विजय भागते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात आले. त्याप्रमाणे ग्रामसभेतून सहकार्य लाभले. त्यानंतरचा प्रवास करताना अनेक मंडळी साथीला साथ देत लाभले. संघाच्या संघटनाला अनेक सभा झाल्या. 

लोकप्रतिनिधीना सदर प्रस्तावाचे निवेदन सादर करण्यात आले. संघाचे कार्यकारिणी दर आठवड्याला सतत या प्रस्तावाचा पाठपुरावा करत राहिले, भेटी गाठी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री सन्मानीय श्री. रवींद्र वायकरजी आणि महसूल व पुनर्वसन विकास मंत्री सन्मानीय श्री . चंद्रकांत दादा पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले. परंतु  सन २०१६-१७ नाबार्ड -२२ च्या अर्थसंकल्प निधी दर्शवून आपले धोरणात्मक काम घेतलं गेलं नाही. परंतु संघाच्या कठोर पाठपुराव्याला अखेर वाचा फुटली.   

लोकप्रतिनिधींच्या शिफारशी मिळाल्या, पुन्हा गाठी भेठी झाल्या. जिल्हाधिकारी यांना पूल बांधणी जागेचा अंदाच पत्रक काढण्यात आले.  पुन्हा एकदा राजापुर-लांजा-साखरपा मतदार संघाचे आमदार साहेब, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा खासदार साहेब आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांना एकत्रित येथील भूभागाचा नकाशा दाखवून त्या पार्श्वभूमी आढावा रेखाटला गेला. मागेही अधिवेशन दरम्यान काय घडलं तर व्यापक लोकभावना आणि येथील लोकांच्या पायाभूत समस्येला खरोखरच हाच पूल दुवा आहे पटवून या संघाने दिले. 

म्हणून आज आनंदाची बातमी सर्वांना ऐकायला मिळत आहे की, नाबार्ड यादीत  "मुचकुंदी नदीवर ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते जाकादेवी मंदिर (वडदहसोळ)" दरम्यान पूलबांधणी काम अधोरेकीत केले गेले आहे. जे ३० वर्षे जमले नाही ते संघांच्या संघटन या संकल्पनेतून प्रलंबित पूल आता मार्गी लागणार.....    

धन्यवाद!!! 



मचकुंदी नदीवर पूल मार्गी लागणार


चला तर या नदीचा उगम कसा झाला?  नदीस नाव कसे पडले?  याचे रहस्य जाणून घ्यायचय चला तर पाहू काय घडलं -----    


 सह्याद्रीच्या पर्वतराजीच्या पट्ट्यात वसलेले माचाल हे गांव. लांजा तालुक्यातील माचाल परिसरातील आणि विशाळगडाच्या पायथ्याशी  असलेल्या कुंडातून मुचकुंदी नदीचा उगम पावतो आणि पश्चिमेला पूर्णगडच्या दिशेने जाऊन सागरला विलीन होते.   

पौराणिक कथेनुसार  सांगितले जाते कि फार पूर्वी तपश्चर्येकरिता मुचकुंद नावाच्या ऋषीनी  या जागेची निवड केली होती.  माचाल गावी असलेल्या सह्याद्रीच्या कड्यावरील एका गुहेत मुचकुंद ऋषी वर्षानुवर्षे तपश्चर्येला बसलेले होते. आजही या ठिकाणी  या ऋषीच्या गुहेचे अस्तित्व आहे. भगवान श्री कृष्णांनी मातवलेल्या कालवयन या राक्षसाचा वध मुचकुंद ऋषीच्या हातून झाला. हा राक्षस देवादिकांना खूप त्रासदायक ठरला तेव्हा या कालवयन राक्षसाचा वध कारण्यासाठी नामी शक्कल लढवली. ऋषीच्या गुहेत प्रवेश करून आपलया अंगावरचा शेला टाकला. श्री कृष्णाच्या अंगावरील शेला ऋषीच्या अंगावर बघून कालवयन राक्षसाला  वाटले या ठिकाणी श्री कृष्ण बसले आहेत. त्यामुळे राक्षस संतापून मारण्यास धावून गेला. यामुळे तपश्चर्येला बसलेल्या ऋषींचा तपात भंग झाला. या क्रोधाने त्याला भस्मसात करून टाकले. अशी माचल गावाची पौराणिक कथा आहे. 

मुचकुंद ऋषीच्या गुहेजवळ कुंड आहेत यातूनच आपल्या मुचकुंदी नदीचा उगम झाला.  या ऋषीच्या नावाने या नदीला मुचकुंदी असे नाव पडले. 



मचकुंदी नदीचा उगम - माचाळ 
ज्या कुंडातून नदीचा उगम झाला ते आजही कुंड पाहायला मिळेल 


    

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"