ओणीत प्रथमच करिअर मार्गदर्शनाचे आयोजन.


करिअर मार्गदर्शन एक प्रेरणादायी शिबीर 

समाजात जनजागृती आणि समाजप्रबोधिनी विचार हे लोककला व नव-नवीन उपक्रम तसेच कार्यक्रमातून  पोहोचविले जातात.  हे आपण आपल्या पूर्वाजांकडून शिकत आलो. आजची आपली पिढी ही स्पर्धात्मक युगात जीवन जगत आहेत. अशा स्पर्धात्मक युगात टिकायचे तसेच उज्वल भविष्य घडवायचे असेल तर हवयं ते फक्त योग्य मार्गदर्शन!

मेहनतीला हवी जिद्द, चिकाटी

ओणीत प्रथमच करिअर मार्गदर्शनाचे आयोजन.

मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर) यांच्या माध्यमातून परिसरातील माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उत्तम आणि प्रेरणादायी करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात येत आहे. तरी या शिबीरात लांजा-राजापुर परिसरातील विद्यालयाने आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवुन लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!!!

प्रगतीच्या उज्वल भविष्यासाठी हवय मोलाच मार्गदर्शन...
चला तर मग जाणून घेऊया करिअर मार्गदर्शनाचे फायदे मग नक्की भेटूया.....

ठिकाण:- श्री. गजानन मंगल कार्यालय, ओणी
              ता. राजापुर, जि. रत्नागिरी

तारिख :- रविवार, ७ जानेवारी, २०१८

वेळ:-       सकाळी १० ते १ वाजेपर्यत.


भविष्याच्या वाटेवर मार्गस्थ असताना असत अनेक प्रश्नांचं ओझं - हवंय योग्य मार्गदर्शन 

मुख्यतः आपल्या ग्रामीण भागांतील मुलांना प्राथमिक शिक्षण घेत असताना भविष्याची व ध्येयाची फारशी जाणीव नसते. माहितीचा अभाव अथवा मार्गदर्शकांचा सहवास कमी प्रमाणात लाभत असल्याने आपले ध्येय निश्चित न करता मुले पुढे माध्यमिक शिक्षण घेतात . परिणामी, मग पुढे भविष्याच्या वाटेवर मार्गस्थ होताना डोक्यात बऱ्याच प्रश्नांनाच ओझं घेऊन दिशा ठरवतो. आपली आवड, कला, गुण यांवर आपण कधीच ठाम नसतो कारण त्यासाठी हवा द्रुढ निश्चिय व आत्मविश्वास! तसेच आपल्या माणसांचा खंबीर पाठींबा! आपल्याला ज्या विषयाची, गोष्टींची आवड, रुची असते त्याची योग्य पारख करून त्यादिशेने पाऊल पडावे यासाठी स्वतःमधील जिद्द आणि विश्वास प्रबळ करावयास हवे योग्य मार्गदर्शन! 


प्रश्नाचं जड ओझं लादू देऊ नका 

बऱ्याच वेळा गावाकडून आलेली मुले कितीही हुशार असली तरी स्वतःमधील आत्मविश्वास प्रस्तावित करताना मागे पडतात त्यामुळे त्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागते.  आपली मुले जरी ग्रामीण भागात शिकून आली तरी ती मुंबई सारख्या औद्योगिक शहरात व्यवसाय, नोकरी किंवा रोजगारकरिता मोठ्या मानाने आणि स्वबळावर उभी राहावीत. यासाठी "मुचकुंदी परिसर विकास संघ" या आपल्या संघटनेच्या माध्यमातून लवकरच परिसरातील विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा मानस आहे.




प्रयत्न वाळुचे कण रगडिता तेलही गळे- प्रयत्नांती परमेश्वर   


लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा जसा आकार द्यावा तसा घडत जातो. त्यांमुळे जे संस्कार त्यांच्या बाळ वयात जडले जातात. सभोवतालच्या परिसराचा आणि राहणीमान याचा देखील न कळत प्रभाव पडतो. तसेच त्यांच्या संगती आणि सहवास याचाही परिणाम आपल्या मनावर होतोच. मुलांच्या जडण घडणीस उत्तम दिशा देण्यास पालकांची देखील जबाबदारी तेवढीच महत्वाचे असते. 

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो 
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
सदन्घी कमळी दडो, मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो, मन भव्चरित्री जडो
              

संस्कृती - सांगत आणि सहवास 




पालकांची जबाबदारी - लहान मुलांसोबत  सुसंवाद साधावा 




प्रेमाचे आणि शाबासकीची थाप सदा पाठीशी राहावी 








वारसा समाज प्रबोधनाचा:-

सुरुवातीच्या काळात शाहीर वर्ग तयार होऊन प्रेरणादायी पोवाडा या संकल्पनेतून जनजागृती करून समाजप्रबोधन करत होते. म्हणूनच आपणास मोठं मोठ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची रूपे कळाली त्यांचे पराक्रम, इतिहास समाजला आणि आपण प्रेरित झालो. त्यानंतर  कीर्तन, भजन, भारूड, वग, नाच आणि नमन अशा अनेक लोककला येऊन त्यातून समाजप्रबोधन होत गेले. आपल्या परिसरात असे कार्यक्रम हे बहुधा सणासुधीलाच पाहायला मिळतात. मात्र आजकाल स्पर्धात्मक व गतिमान जीवनात लोकांचा कल रंगीत कलेकडे वाहत चाललेला आहे.  समाज प्रबोधन हे फार कमी पडत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे विचारवंतांचे विचार आणि अनुभव यांचा नक्कीच अभाव जाणवू लागला आहे. थोरांचे विचार हे मात्र शाळेमर्यादित न राहता त्यांचा आदर्श घेऊन अंगी बाळगणे आवश्यक आहे .       

पोवाड्यातून विचारवंत आणि पराक्रमाची गाथा वर्णूं समाजप्रबोधन



सर्व समभाव,  एकीची भावना आणि आपली संस्कृती जपणूक हाच भावी पिढीला संदेश.  











Comments

  1. सुंदर मेसेज आणि फोटोसुद्धा बोलके आहेत.समाजप्रबोधनासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे.त्याचा अगदी योग्य वापर करता आहात.
    मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"