साऱ्यांचेच लक्ष आता मुचकुंदी नदीवरील पुलाच्या बांधणीकडे ....
सर्वाच्याच मनात कित्येक वर्षे घर करून लांबणीवर राहिलेले स्वप्न म्हणजे मुचकुंदी नदीवरचा प्रलंबित पूल अखेर मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा - राजापूर) संघटनेच्या
संघटन या भावनेतून लवकरच साकार होणार..
 |
मुचकुंदी नदीवर पुलाच्या बांधणीस मोजमाफ करताना सा. बां.वि. लांजा अधिकारी व गोळवशी -वडदहसोळ स्थानिक मंडळी
|
प्रास्ताविक पुलाचे काम नाबार्ड २३ या योजनेअंतर्गत प्रस्तापित होऊन येथील सर्व स्थानिक जनतेला दिलासा.
मुचकुंदी नदीवर
ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते जाकादेवी मंदीर (वडदहसोळ) दरम्यान पूल प्रकल्पाच्या पूर्वचाचणी व मोजमाफ करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा कर्मचारी व अधिकारी मुचकुंदी नदीच्या पात्राची लांबी - रुंदी तसेच पुलाची उंची यांचे मोजमाफणी करण्यास आज सोमवार, दि. १६ ऑक्टोबर २०१७ या दिवशी नदीची भेट घेतली.
नदीच्या दोन्ही काठावर देवी देवतांचे वास्तव्य आहे. भौगोलिक दृष्ट्या सुंदर असा परिसर भविष्यात मोठी बाजारपेठ निर्मितीस अनुकूल असे मध्यवर्ती ठिकाण आणि परिसराच्या दळणवळणातील महत्वपूर्ण दुवा ठरणार जोडमार्ग नदीकाठी वसलेल्या आई श्री. जाकादेवी व धावगा देव यांच्या कृपादृष्टीने व दोन्ही गांवाच्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हा प्रलंबित पूल मार्गी लागवा.
हा ब्लॉगर वाचणार्या वाचक मित्र, सहकारी, ग्रामस्थ, हितचिंतक व लोकप्रतिनिधी तसेच नेहमी उपयोगी पडलेल्या सर्व अधिकारी यांचे शतशः आभार !!!
धन्यवाद!!!
- मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा - राजापूर) मुंबई रजि.
 |
मोजमाफी दरम्यान प्रास्ताविक पुलाची पायाभूत सुविधांकरिता गरज सा. बां. अधिकारी यांना सांगताना ग्रामस्थ मंडळी.
|
 |
| पुलास अनुकूल वातावरण - चाचणी पडताळणी झाली यशस्वी |
 |
| लांजा - धावगा देव गॊळवशी कडून नदीचा तट |
 |
| नदीच्या पात्राची उंची मोजमाफ - पूल बांधणीची उंची चाचणी |
 |
| संघ सचिव - गणेश खानविलकर सोबत पाहणी करताना |
Comments
Post a Comment