Posts

सभासद आवाहन

Image
 

सबस्क्राईब ब्लॉगर

Image
मुचकुंदी परिसर विकास संघ  ( लांजा-राजापुर ) मुंबई   रजि . धरु एकात्मेची कास, करू परिसराचा विकास ! आपणास या संघाच्या संकल्पना आवडल्यास  नक्की या ब्लॉग ला भेट दया!  सबस्क्राईब या बटणावर क्लीक करून तिकडे आपला मेल आयडी प्रविष्ट करा आणि कॅपच्या (अंक,अक्षरे) लिहून सबस्क्रिप्शन विनंती पाठवा व आपल्या मेलवर आलेल्या लिंकवर क्लीक करून नक्की सबस्क्राईब करा. जर संघटनेच्या संकल्पना व कार्य आपणास आवडल्यास नक्की भेट द्या  

आरोग्य_शिबीर_दिमाखात_संपन्न

Image
परिसराच्या सर्वांगीण विकासपर्वातील उल्लेखनीय कामगिरी... रविवार दि. १ ऑक्टो, २०१७ रोजी कोंडये (लांजा) येथे " मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा- राजापुर) मुंबई रजि." आयोजित " मोफत आरोग्य तपासणी शिबीर " अत्यंत नियोजनबद्द व दिमाखात संपन्न. उत्कृष्ट असे शिबीराचे नियोजन करून विकासपर्वात कौतुकास्पद झेप, सोबत दिलेल्या चित्रातुन दिसुन येते. उपक्रमा दरम्यान उपस्तिथ कोंडये गावप्रमुख, ग्रामस्थ, महिला, कोंडये सरपंच बाई, कोंडये शाळा नं. १ चे मुख्याध्यापक, श्री. दत्तसेवा ट्रस्ट,पेंडखळे विश्वस्थ, संघाचे पदधिकारी, आरोग्य संघटक, आणि कार्यकर्ते इत्यादी.

संघाची सविस्तर माहिती

Image
संघटनेची_माहिती:- सुरुवात - सोशिअल मीडियाद्वारे    दि. २७ सप्टेंबर, २०१६ या दिवशी सोशिअल मीडिया (व्हाट्सअप) माध्यमातून मुचकुंदी नदीवर पूल व्हावा ही लोकांची प्रलंबित मागणी पूर्णत्वास जावो, कारण त्यामुळे शाळकरी मुलाना शाळेत जाणे, दळणवळण सोईस्कर आणि लांजा - राजापुर बाजारपेठा बारमाही जोडल्या जाव्यात या उद्देशाने मुचकुंदी नदी परिसर या नावाचा व्हाट्सअप ग्रुप हा संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. विजय भगते यांच्या कल्पनेतुन बनविला गेला. या सुंदर संकल्पनेला तरुणांनी चांगला पाठिंबा देत पुढे रविवार दि. १६ ऑक्टो, २०१६ रोजी माटुंगा, पाच उद्यान, मुंबई येथे ★ ग्रा. मा. क्र. ११३ (गोळवशी) ते श्री. जाकादेवी मंदीर (वडदहसोळ) दरम्यान प्रलंबित " पूलबांधणी "  व्हावी याकरिता "मुचकुंदी परिसर विकास संघ" लांजा - राजापुर  या संघटनेची स्थापना करण्यात आली. तात्पुरत्या कार्यकारिणी संघाची सुरुवात झाली. त्यानंतर दि. ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी लांजा राजापुर तालुक्यातील तमाम जवळ जवळ १०० ते १२५ लोकांच्या उपस्तिथित कायस्वरूपी कार्यकरिणी निवड करून विकासकामाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली...