द्वितीय वर्धापनदिन सोहळा-18 नोव्हेंबर

नमस्कार मंडळी,

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूरतर्फे संघाच्या वर्धापनदिन निमित्ताने भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे


कार्यक्रम स्थळ:
दिनांक -18 नोव्हेंबर 2018
वार- रविवार
वेळ- सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत
स्थळ- श्री एम. डी. आहुजा ट्रस्ट,
132,सेंट पॉल स्ट्रीट,एम. डी. ट्रस्ट बिल्डिंग,फन एन शॉप च्या मागे,हिंदमाता, दादर (पूर्व) मुंबई-400014


     ज्याची आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपणा सर्वांच्या एकजुटीने गेल्या दोन वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविले आणि यशस्वीही केले..नियोजन टीम हा सोहळा "न भूतो न भविष्यती" करण्यासाठी सज्ज आहे..

वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक
वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबंध.
संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाचे कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळी, सदस्यांचा, महिला एका धाग्यात विनलेला गुंफण सोहळा म्हणजे वर्धापन दिन सोहळा  !!!

 मुचकुंदी परिसर विकास संघाचा दूसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा होणार आहे.याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.तेव्हा लांजा-राजापूर परिसरातील सर्व ग्रामस्थ,मुंबईकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे हि नम्र विनंती...!


मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर मुंबई (रजि.)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"