मुचकुंदी परिसर विकास संघ तर्फे राजापूर,ओणी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन...

―चला निर्माण करूया कोकण पॅटर्न...

#MPVS संस्थेच्यावतीने ओणी येथे आयोजित करिअर मार्गदर्शन शिबीर;लांजा-राजापूर तालुक्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना  शैक्षणिक परिसंवादाचे आवाहन.....

#रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३
#सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत 
#श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय-ओणी, राजापूर 

✍🏻करियर म्हणजे काय...? योग्य करिअर कसे निवडू..? गोंधळून जाऊ नका. 
याचसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...

एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग अंतर्गत "मार्गदर्शन आमचे, निवड तुमची” या संकल्पनेचा एक भाग म्हणून ग्रामीण स्तरावर रविवार दि. ०८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १० ते दु. १:०० वाजेपर्यत राजापूर तालुक्यातील "श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय, ओणी" येथे शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थी भविष्यातील करियरच्या विविध वाटा, त्यादृष्टीने आपली वाटचाल, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यातून आपली पुढील वाटचाल याविषयी जाणून आपल्या भविष्यातील करिअरमधील ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्या शाळेतील - महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सदर "करिअर मार्गदर्शन शिबिरात सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती! 

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. वैभव भगते ९९६९२३५१५० 
श्री. सुजय गितये ९७७३२६५८२५

आपले स्नेहांकित, 🙏🏻
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर
संलग्न, एमपीव्हीएस शैक्षणिक विभाग

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"