Posts

आरोग्य जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याकरता आवाहन पत्रक...

Image
नमस्कार!🙏🏻 आपण आपल्या मंडळ,संस्था, संघटन याना वरील पत्र देऊन त्यांच्याकडून पाठिंबा / सहकार्य पत्र देऊन या लढ़यात सहभागी व्हा!!! लांजा-राजापूर आरोग्य सेवा सुविधात्मक विकसित करण्यास आपले पाठिंबा दर्शविणारे पत्रक महत्वाचे आहे. आरोग्यचा लढा एकजुटीने देऊया.... हा लढा कुणा एकाचा नसून तुम्हा-आम्हा सर्वांचाच आहे.... संघटीतपणाने लढा लढण्याचा.. जर जपले गांभीर्य आरोग्याचे, तरच प्रश्न सुटतील सर्व सामान्यांचे

आरोग्य जनजागृती मोहीम -24 नोव्हेंबर 2019...

Image
नमस्कार! मंडळी🙏🏻 *#लढाई आरोग्याची, चळवळ मुचकुंदीची...* आरोग्याची दुरावस्था हा प्रश्न ग्रामीण भागातच का? का. सरकारचे आरोग्यसेवा देणारे अधिकार ग्रामीण ठिकाणी लागू नाहीत असे आहे का? तर नाही. याचे खरे कारणीभूत *आमचे आम्हीच* आहोत. प्रत्येकाने स्वत:लाच प्रश्न विचारुन पहावे. आपण आपला हक्क कधी जाणून घेतलाच नाही. जाणून घेतला तरी आपला आपण. एकट्याने दिलेल्या आवाजाचा पल्ला लांब नसतो. पण तोच आवाज समुहात समूहाच्या बरोबरीने दिला तर अधिक आक्रमक आणि लांब पल्याच्या लहरी उभारणारा असतो. मग तुम्ही जाणता आहात आपले म्हातारे-कोतारे आई-वडील, वयोवृद्ध मंडळी हे बहुधा गावातच राहण्याचे पसंद करतात. आजचा हा लढा त्यांच्यासाठी, उद्याचा स्वतासाठी आणि भावी पिढीसाठीच हा लढा असणारा आहे.  *आपल्या मुलभूत हक्काच्या लढ्यासाठी फक्त गरज आहे ती एकीची! एकात्मतेच्या वज्रमुठीची!आपल्या सर्वांच्या एकनिश्चयी विचारांच्या एकजुटीची!* अचानक येणारे आजारपणाबरोबरच आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात/ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारांतर्गत मिळणाऱ्या सेवा मिळताहेत का? यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. सद्यस्थित आरोग्य व्यवस्थेची वाणवा असून त्या धू...

आरोग्य जनजागृती मोहीम -24 नोव्हेंबर 2019

https://youtu.be/0cZMPXJ30oU चलो लांजा.... *आम्ही मुचकुंदी परिसर विकास संघ घेऊन येत आहोत "आरोग्यविषय जनजागृती मोहीम".... आपल्या सर्वसामान्य जनतेच्या हक्काची ही पहिली झेप...* पार्श्वभूमीवर, सद्यस्थित ग...

शेतकऱ्यांना वाली कोण आहे का....??

आज बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा सण. पिकं घरात आणली की आनंदाने तो साजरा केला जातो. पण, खरेच, शेतकऱ्यांच्या घरात आनंद आहे का? अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेय. कोकणासह र...

द्वितीय वर्धापनदिन सोहळा-18 नोव्हेंबर

Image
नमस्कार मंडळी, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूरतर्फे संघाच्या वर्धापनदिन निमित्ताने भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तेव्हा आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे कार्यक्रम स्थळ: दिनांक -18 नोव्हेंबर 2018 वार- रविवार वेळ- सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत स्थळ- श्री एम. डी. आहुजा ट्रस्ट, 132,सेंट पॉल स्ट्रीट,एम. डी. ट्रस्ट बिल्डिंग,फन एन शॉप च्या मागे,हिंदमाता, दादर (पूर्व) मुंबई-400014      ज्याची आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपणा सर्वांच्या एकजुटीने गेल्या दोन वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविले आणि यशस्वीही केले..नियोजन टीम हा सोहळा "न भूतो न भविष्यती" करण्यासाठी सज्ज आहे.. वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबंध. संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाचे कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळ...

मुचकुंदी परिसर विकास संघ(लांजा-राजापूर) द्वितीय वर्धापनदिन...

Image
मित्रहो, नमस्कार!🙏🏻 *🥁वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक*🎷 *🏵वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबध.* *✍🏻संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाच कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळी, सदस्यांचा, महिला एका धाग्यात विनलेला गुंफण सोहळा म्हणजे वर्धापन दिन सोहळा!!!* *✍🏻चला तर... मुचकुंदी परिसर विकास संघाचा दूसरा वर्धापन दिन सोहळा आपण लवकरच घेऊन येत आहोत..* 🏵या सोहळ्यास संस्स्थेचा घटक म्हणून काही देन लागतो हे जाणून *आर्थिक सहकार्याचा हात*💰 देऊन संस्थेच्या कार्यात सहभाग द्यावा... *🤝🏻आम्ही सुरुवात केलेली आहेच आपणही आपली रक्कम स्वश्चेने द्यावी, धन्यवाद!* _*📞रक्कम भरणा करिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.*_ @अजय मांडवकर 8655114496 @महेश मांडवकर  9773356316 @बलराम तांबे 900405868 किंवा → *सोबत दिलेल्या बँक A/C मध्ये भरू शकता..* *देण्यात आलेल्या रक्कमेची नोंद आकर्षक बैनर वर करण्यात ये...

मुचकुंदी नदीवरील गोळवशी ते वडदहसोळ या मार्गावर शासनाची पूलप्रकल्पाला मंजुरी....

Image
*- सेतू बांधा रे बांधा*             *पहिल्या पर्वाची यशस्वी वाटचाल✈* मित्रहो, सप्रेमपुर्वक नमस्कार वि.वि.!🙏🏻 ✍🏻भिन्न विचारांना जुळविण्यास हवा असतो तो "सहकार सेतू" त्याप्रमाणेच दोन भिन्न रूपाना एकरूप करण्यास हवा असतो तो फक्त "स्नेहहेतू! समांतर रेषा कधीही एकत्र येत नाही खर आहे मात्र दोन समविचारी एकत्र आले तर इतिहास घडतो! त्यात अवघाची सहकार आणि विश्वास हाच एकमेव दुवा ठरत ऋणानुबंध घडत राहतो. सहकाराची भावना आहे, सत्यात उतरायची तयारी आहे,  वास्तवाशी झुंज द्यायला मनुष्यबळ आहे मग दोन प्रांत एक होणे सहाजिकच! अशीच एक *वास्तवदर्शी संघर्षमय कहाणी आहे लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमेवरुन प्रवाहीत मुचकुंदी नदीवरील पूलाची.* नदीकाठी वसलेल्या गोळवशी-वडदहसोळ ही गावं कित्येक वर्ष नदीप्रवाहामुळे एकमेकांपासून दूर होते. शाळकरी मुलांचा, ग्रामस्थांचा जीवघेणा होडीप्रवास आणि दळणवळणदृष्टया गंभीर समस्येखाली हा परिसर अविकसित निपचिप पडून होता. आपापल्यापरीने दोन गांव जोड करण्यास नदीवर पूलबांधणी व्हावी म्हणून एकेरी झुंज चालली होती. परंतू ...