आरोग्य जनजागृती मोहीम -24 नोव्हेंबर 2019...
नमस्कार! मंडळी🙏🏻
*#लढाई आरोग्याची, चळवळ मुचकुंदीची...*
आरोग्याची दुरावस्था हा प्रश्न ग्रामीण भागातच का? का. सरकारचे आरोग्यसेवा देणारे अधिकार ग्रामीण ठिकाणी लागू नाहीत असे आहे का? तर नाही. याचे खरे कारणीभूत *आमचे आम्हीच* आहोत. प्रत्येकाने स्वत:लाच प्रश्न विचारुन पहावे. आपण आपला हक्क कधी जाणून घेतलाच नाही. जाणून घेतला तरी आपला आपण. एकट्याने दिलेल्या आवाजाचा पल्ला लांब नसतो. पण तोच आवाज समुहात समूहाच्या बरोबरीने दिला तर अधिक आक्रमक आणि लांब पल्याच्या लहरी उभारणारा असतो.
मग तुम्ही जाणता आहात आपले म्हातारे-कोतारे आई-वडील, वयोवृद्ध मंडळी हे बहुधा गावातच राहण्याचे पसंद करतात. आजचा हा लढा त्यांच्यासाठी, उद्याचा स्वतासाठी आणि भावी पिढीसाठीच हा लढा असणारा आहे.
*आपल्या मुलभूत हक्काच्या लढ्यासाठी फक्त गरज आहे ती एकीची! एकात्मतेच्या वज्रमुठीची!आपल्या सर्वांच्या एकनिश्चयी विचारांच्या एकजुटीची!*
अचानक येणारे आजारपणाबरोबरच आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात/ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारांतर्गत मिळणाऱ्या सेवा मिळताहेत का? यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. सद्यस्थित आरोग्य व्यवस्थेची वाणवा असून त्या धूळीला जात असल्याने वेळीच सुधारणा होणे जरुरी आहे.
पण हो! *हा प्रश्न जनसामान्यांचा, एकनिश्चयी विचारांचा, हक्क आमचा सदृढ़ आरोग्याचा* अशी आरोळी देत संघटनेने *#आरोग्य विषय* हाती घेतलेला आहे. गेली अडीच वर्षे या विषयावर जोरकसपणे काम करीत आहोत. लोकांच्या प्रश्नाना प्रशासनांकडून आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शासन दरबारी दखल घेतली जावी; यासाठी संबधित विषयाकरिता प्रत्यक्ष भेटी-गाठी तसेच पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य व्यवस्था सक्षमपणे मिळाव्यात यासाठी; *रविवार दि. २४ नोव्हेंबर, २०१९ रोजी लांजा येथे "आरोग्य विषय जनजागृती मोहीम उपक्रमात आपण तमाम लांजा-राजापूर वासियानी सक्रीयतेने सहभाग घ्यावा! असे आवाहन "मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर" या सामाजिक संघटनेच्यावतीने केले आहे.*
Comments
Post a Comment