मुचकुंदी नदीवरील गोळवशी ते वडदहसोळ या मार्गावर शासनाची पूलप्रकल्पाला मंजुरी....




*- सेतू बांधा रे बांधा*
            *पहिल्या पर्वाची यशस्वी वाटचाल✈*
मित्रहो,
सप्रेमपुर्वक नमस्कार वि.वि.!🙏🏻
✍🏻भिन्न विचारांना जुळविण्यास हवा असतो तो "सहकार सेतू" त्याप्रमाणेच दोन भिन्न रूपाना एकरूप करण्यास हवा असतो तो फक्त "स्नेहहेतू! समांतर रेषा कधीही एकत्र येत नाही खर आहे मात्र दोन समविचारी एकत्र आले तर इतिहास घडतो!
त्यात अवघाची सहकार आणि विश्वास हाच एकमेव दुवा ठरत ऋणानुबंध घडत राहतो.
सहकाराची भावना आहे, सत्यात उतरायची तयारी आहे,  वास्तवाशी झुंज द्यायला मनुष्यबळ आहे मग दोन प्रांत एक होणे सहाजिकच!
अशीच एक *वास्तवदर्शी संघर्षमय कहाणी आहे लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमेवरुन प्रवाहीत मुचकुंदी नदीवरील पूलाची.* नदीकाठी वसलेल्या गोळवशी-वडदहसोळ ही गावं कित्येक वर्ष नदीप्रवाहामुळे एकमेकांपासून दूर होते. शाळकरी मुलांचा, ग्रामस्थांचा जीवघेणा होडीप्रवास आणि दळणवळणदृष्टया गंभीर समस्येखाली हा परिसर अविकसित निपचिप पडून होता. आपापल्यापरीने दोन गांव जोड करण्यास नदीवर पूलबांधणी व्हावी म्हणून एकेरी झुंज चालली होती. परंतू *"सेतु बांधा रे बांधा"* अशी आरोळी ठोकत लांजा-राजापूर तालुक्यातील संबध मुचकुंदी परिसरातून तरुणांसोबत ग्रामस्थांनी *"मुचकुंदी परिसर विकास संघाच्या"* अधिपत्याखाली एकसंघ झाले. लोकप्रतिनिधी, संबधीत खात्यांच्या मंत्री महोदयाना कित्येक वर्षाचा संग्रही कागदी लेखा-जोखा, एकूण अविकसित भूभागाचा परिचय(नकाशासहित वर्णन) प्रत्यक्षात अनेक भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत जनहितार्थ विचार मांडण्यात आले...
किती वर्षे झाली? पण नदीवरचा पूल असाच आमच्या स्वप्नात. का? माहिती नाही? अहो, रात्रीची स्वप्न खरी होतीलच अस नाही पण मुचकुंदी परिसर विकास संघाने दिवसा स्वप्न पहायची सवय लावली. प्रत्यक्षात काम करून! अहोरात्र मेहनत आणि पाठपुरावा करत! संघाच्या उभारणीने खडबडून झोपेतुन जागे करण्यात आले. पण जे झोपेचे सोंग घेऊन आहेत ते आजतगायत झोपुनच आहेत. आज श्रेय घेण्याच्या शर्यतीत ओबडधोबड़ बातम्या फिरू लागल्या आहेत परिपूर्ण माहिती नसताना देखील. मग त्या शाब्दिक असो,छापिल असो किंवा सोशियल मिडियावरील असतील. सहकार अभावी काम कठीण हे पाहता परिसराच्या सर्वांगीण विकासाकरिता होतकरु तरुणांनी संकल्प केला...
*🤝🏻एकोप्यातून दृढ़निश्चय आणि दृढ़निश्चयातुन स्वप्नपूर्ती, पूलाचे काम!!!*
अहो ही मुचकुंदी (MPVS) आहे. शब्दाने नाही तर शब्दावर ठाम राहून काम करते.. ऐरव्ही संघाचे नाव ऐकताच "गोळवशी-वडदहसोळ" पूलासाठी खड़बडून जागे होणारे यावेळी बातमी आणि मेसेजबाजी मध्ये अग्रेसर दिसून आलेत. पण जाऊद्या यशाचे खरे शिलेदार आपणास माहितच आहेत.... ज्यानी शासनदरबाराचे बंद दार उघडे केले. संघ उभारणी करून नाबार्ड योजनेअन्तर्गत पूलप्रकल्प व्हावा यासाठी नाबार्ड-२२, अतिरिक्त नाबार्ड-२२, नाबार्ड-२३, आणि अखेर नाबार्ड-२४ अशी निवेदनशीर पत्रव्यवहार करण्यात आले होते. 

आतापर्यत संघाने मुंबईहून ग्रामीण स्तरापर्यंत तब्बल १ वर्ष १० महिन्याच्या कालावधीत २५ ते ३० सभांच्या आयोजनातून विचारमंथन केले गेलेले आहे हे अवघ्या मुचकुंदी परिसराला ज्ञात आहे. परिसरात संघाने कमी वेळेत केलेले हे काम स्तुत्य आणि हेवा वाटावा असेच आहे. पूलासोबत विविध लोकोपयोगी शिबीरे आणि संकल्पना राबवत कार्यक्षेत्रात दिमाखात संघटना कार्यरत  आहेत.
दरम्यान *नाबार्ड २४ योजेनअंतर्गत बहुप्रतिष्टित पूलास ३ कोटी १० लाख मंजूर* करून पुढील प्रशासकीय प्रकिया चालू झालेली आहे. *या विकासकामात सहकारी आणि वाटाड्या म्हणून सोबती लाभले त्या सर्व MPVS पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सन्मानीय आमदार साहेब, सन्मानीय खासदार साहेब, जिल्हा पालकमंत्री, इतर मंत्री महोदय साहेब, प्रशासकीय अधिकारी तसेच वरिष्ठ पत्रकार बंधू या सर्वांचे मुचकुंदीमय आभार!!*
या सामाजिक संस्थेला आपली साथ अशीच राहो!!
धन्यवाद!
- श्री. अजय मांडवकर | सहसचिव, समन्वयक
*🌷मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर मुंबई ®🌷*






Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"