मुचकुंदी नदीपुलासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चासत्र बैठक..

🌷मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापुर मुंबई (रजि.)🌷
*#आपण_आपल्यासाठी_बनविलेले_संघटन*
=============================
संस्नेह नमस्कार!

*आवाहन...चलो... मुचकुंदी तिरावर→*
#चर्चासत्र_बैठक* *#स्वप्न सर्वांचे ---- पूलप्रकल्प*✊🏻

आपल्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकासात्मक दर्जा उंचवावा, शहरीकरण व्हावे, सुख-सोई, उच्च शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, उत्तम बाजारपेठा, रोजगार तसेच शहरी राहनीमान व्हावे असे सर्वांच्या मनात असते.

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, समाजातील रीती-रिवाज, जडणघडनीतून तो शिकत-शिकत प्रगतीच्या शिखराकडे मार्गस्थ होत असतो. म्हणून आपण समाजाला काही देणे लागतो, समाजकार्य हे सर्वांत मोठे पुण्याचे कार्य असे समजतो. असेच समाजकार्य करण्यास परिसराचा आणि सर्वांगीण विकास घडविण्यास लांजा-राजापुर परिसरातील तरुणवर्ग "मुचकुंदी परिसर विकास संघ" संघटनेच्या छत्राखाली संघटित झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापुर तालुक्याच्या सिमेवरुन प्रवाहित मुचकुंदी नदीकाठी वसलेले गोळवशी (लांजा) आणि वडदहसोळ (राजापूर) याठिकाणी पूलप्रकल्प व्हावा ही लोकांची मागणी योजनेअन्तर्गत लोकप्रतिनिधी, व सरकारकडून मार्गी लावण्यास "मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापुर" प्रयत्नशीर आहेत.

कारण पावसाळ्यात ही नदी दुथड़ी भरून वाहते आणि दोन्ही तालुक्यातील गावांचा एकमेकांशी असलेला आप्तेष्ट नातेसंबधीत संपर्क तुटला जातो तो अगदी पावसाळा संपेपर्यत. शाळकरी मुले मात्र शिक्षणाच्या पोटी आपला जीव मुठीत ठेऊन होडीप्रवास करून शिक्षण घेतात. गर्भवती महिला, आजारी माणसे, म्हातारे कोतारे यांना गावातील अपुऱ्या आरोग्य सुविधामुळे दवाखाण्यास जाण्यास क्रमपात्र ठरते किंबहुना अधिक खर्चिक जाते.

पूलाचे ठिकाण मध्यवर्ती असून जवळ-जवळ लांजा-राजापूर तालुक्यातील १८ ते २० गावांच्या दळणवळणदृष्टया सोईचे व जवळ जवळ २५ ते ३० किलोमीटरने कमी अंतराचे होणारे आहे. नदीकाठी बाजारपेठ निर्मितीस देखील अनुकूल वातावरण आहे. म्हणजेच, भविष्यात रोजगाराला वाचा फुटेल व गरजवंताना दिलासा मिळू शकतो. नुकत्याच झालेल्या चाचणीतून नदीचे पात्र तसेच दोन्ही बाजूचे तट पूल उभारणीस अनुकूलता दर्शविली गेली.

आपल्या सर्वांचे हे #महत्वाकांक्षी बहुप्रतिष्टित *पूलबांधणी* कामकाज मार्गी लागल्यास भविष्यात लांजा व राजापूर बाजारपेठा कायमस्वरूपी जोडल्या जातील व परिसरातील संबध गावाच्या विकासकामांचा दर्जा उंचावला जाईल.... त्याचा परिणाम हा राहनीमानावर होईल.

म्हणूनच आपल्या सर्वांच्या सहकारातुन 👉 ग्रा.मा.क्र.११३ गोळवशी (लांजा) ते श्री. जाकादेवी मंदीर - वडदहसोळ (राजापुर) दरम्यान पूलबांधणीसंदर्भात मुचकुंदी नदी तिरावर वडदहसोळ येथील *_श्री. जाकादेवी मंदीरात_* आपल्या मतदारसंघातील_*लोकप्रतिनिधी*_ आमदार, खासदार समवेत थेट ग्रामस्थांची बैठक...घडवून प्रस्ताविक कामकाजासंबधी महत्वपूर्ण चर्चा होणार आहे......

तरी परिसरातील तमाम बंधू-भगिनी, ग्रामस्थ मंडळीनी या बैठकिस बहुसंख्येने उपस्तिथ राहण्याची कृपा करावी....आपले आमदार खासदार आपल्या प्रश्नाचे नक्की निवारण करतील अशी आशा आहे.

धन्यवाद!

धरु एकात्मेची कास, करू परिसराचा विकास!

जय हो!
============================
*_ठिकाण:- श्री. जाकादेवी मंदीर, वडदहसोळ, (गितये वाड़ी एस.टी. स्टॉप च्या बाजूला)*
*ता. राजापुर, जि. रत्नागिरी*

*_रविवार, दि. ११ फेब्रु, २०१८_*
*_ठीक. सायं. ५:३० वाजता_*

आपले स्नेहांकित

अजय मांडवकर | सहसचिव समन्वयक
मुचकुंदी परिसर विकास संघ.

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"