मुचकुंदी परिसर सर्वसाधारण सभा यशस्वी संपन्न...
नमस्कार,
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर मुंबई (रजि.)
संघाच्यावतीने रविवार, १० जून २०१८ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता ठिकाण:- तुळसी मानस परेल, मुंबई येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते तरी सदर सभा उत्कृष्टरित्या संपन्न झाली.
सभेला 30 ते 35 सभासद उपस्थित होते..
सभेपुढे घेण्यात आलेले विषय:- ✍
१) आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेणे.
२) महिला संघटन निर्माण- पदाधिकारी निवड करून कार्यक्षम करणे.
३)सभासद संघटन टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या माध्यमातून "MPVS समाजकल्याण फंड" उभारणी.
४)पाठपुरावा टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या पुढील कामे नियोजन.
5)सभेतून येणारे विषय...
२) महिला संघटन निर्माण- पदाधिकारी निवड करून कार्यक्षम करणे.
३)सभासद संघटन टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या माध्यमातून "MPVS समाजकल्याण फंड" उभारणी.
४)पाठपुरावा टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या पुढील कामे नियोजन.
5)सभेतून येणारे विषय...
आजच्या सभेची काही क्षणचित्रे..
MPVS आयोजित पावसाळी सर्वसाधारण सभेला महिलानी सहभाग दर्शवला आणि संघाच्या सामाजिक कार्यात एकसंघ झाल्या त्याबद्दल संघाकडून शुभेच्छा.
महिलांचे संघटक कार्यक्षम करण्यास प्रमुख उपस्तिथी लाभलेल्या महिला प्रमुख सौ. पल्लवी ताई नवरे आणि पत्रकार कविताताई नागवेकर यांचे स्वागत व आभार करतानाचा क्षण....
आज सर्वसाधारण सभेनिमित्त संघात एका हुरहुन्नरि कवीचे दर्शन घडले. त्यांनी परिसरात चाललेल्या व्यथा आणि कथा आपल्या काव्यातून व्यक्त करताना कळसवली गावचे श्री.मनोहर शेवड़े साहेब. संघातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत!


MPVS आयोजित सर्वसाधारण सभेची वार्ता थेट मुचकुंदी नदीच्या उगमस्थानपर्यंत..
संघाच्या संपूर्ण संकल्पनेची आणि तत्वावर केलेल्या विचारांची माहिती घेत संपूर्ण सभागृहाला दुर्गम माचाल गावाची एकूण परिस्थिती सांगून भविष्यात आपल्या परिसरात उत्तम पर्यटनस्थळ निर्माण व्हावे अशी इच्छा व्यक्त करत संघाच्या कार्याला उत्तम प्रतिसाद दिला.
आज झालेल्या सर्वसाधारण सभेनिमित्त MPVS क्रिकेट समिती पदाधिकारी श्री. दशरथ तांबे यांना लग्नाचे आहेर प्रदान करताना MPVS क्रिकेट समिती.....

आज झालेल्या सभेत कर्नाळा अभयारण्य व किल्ले दर्शन यां माहिती उपस्थितीत सभागृहला सांगताना सफ़र सह्याद्रि ट्रेकर्स प्रमुख व संघाचे फेसबुक समन्वयक किरण भालेकर...

सर्व मान्यवर सभासद,कार्यकारी समिती,हितचिंतक..









Comments
Post a Comment