मुचकुंदी परिसर विकास संघचा पाचवा वर्धापन दिन सोहळा २३ एप्रिल रोजी !
मुचकुंदी परिसर विकास संघचा पाचवा वर्धापन दिन सोहळा २३ एप्रिल रोजी !
हे निमंत्रण एकजुटीचे, आपुलकीचे, एकनिश्चयाचे आणि स्नेहसंमेलन सोहळ्याचे..!
राजापूर प्रतिनिधी-
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन सोहळा आणि स्नेहसंमेलन येत्या २३ एप्रिल 2022 रोजी मुचकुंदी नदी काठाजवळील श्री जाकादेवी मंदीर, वडदहसोळ गितयेवाडी मंदीर येथे होणार असून या निमीत्ताने विविध समाज उपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेमार्फत लांजा व राजापूर मधील ग्रामिण भागातील सामान्य माणसाला सक्षम व सुदृढ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात व जनतेचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर हि संस्था पाच वर्षा पासून आरोग्य, शिक्षण आणि सर्वागीण विकास मुद्यावर कामकरीत आहे. संस्थे पाच वर्षात अनेक स्थानिक कामे पूर्ण केली आहेत त्यांची मांडणी जनतेसमोर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्या समोर मांडणार आहे.
शनिवार दि.२३ एप्रिल २०२२ रोजी स. १० ते दु.१२ वा.मोफत आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात रक्तदाब,मधुमेह,ओक्सीजन लेव्हल,प्राथमिक तपासणी उपचार,वैद्यकीय मार्गदर्शन, दुपार १ ते दु.२ वा.मध्यांतर स्नेहभोजन,दुपारी २.३० ते सायं.६.३० वा.मान्यवरांचे स्वागत,प्रास्ताविक,अध्यक्षीय भाषण,महिलांसाठी हळदीकुंकू,सायं.७ ते ८ वा पाहुणचार जेवण, रात्रौ. ८ ते ९.३० वा. यशोगाथा-संस्थेच्या कार्याचा प्रवास वर्णन, शिलेदारांचे अनुभव-कौतुक सोहळा, बक्षीस वितरण आणि रात्रौ.९.३० वाजता महालक्ष्मी नमन मंडळ, असुर्डे (जांभुळवाडी) ता. संगमेश्वर येथील कोकणची लोककला नमन पार पडणार आहे.
हे निमंत्रण एकजुटीचे, आपुलकीचे, एकनिश्चयाचे आणि स्नेहसंमेलन सोहळ्याचे आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने स्थानिक प्रश्नांवर जनतेला एकत्र करणे हा आहे. या निमित्ताने मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री विजय भगते, कार्याध्यक्ष अमोल पळसमकर, सचिव महेश मांडवकर आणि अजय मांडवकर आणि संपूर्ण कार्यकारिणी मधील सर्व पदाधिकारी यांच्या कडून दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांना, सभासद, बंधु भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment