―८ वा वर्धापन दिन सोहळा ―गोळवशी-वडदहसोळ पूलप्रकल्प लोकार्पण सोहळा #आग्रहाचे निमंत्रण!🌹 हे निमंत्रण एकजुटीचे🤝 हे निमंत्रण आपुलकीचे❣️ हे निमंत्रण एकनिश्चयाचे✊🏻 हे निमंत्रण स्नेहसंमेलन सोहळ्याचे...🌹 मुचकुंदी नदीवर बहुप्रतिक्षित लांजा राजापूर दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या "स्वप्नपूर्ती गोळवशी-वडदहसोळ" पूलाचा लोकार्पण सोहळा* आणि एमपीव्हीएस संघटनेचा ८वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१७ मे, २०२५ रोजी दु. ३ते रात्रौ ११:०० वाजता श्री. जाकादेवी मंदिर, वडदहसोळ ता. राजापूर* याठिकाणी आयोजित करण्यात येत असून सदर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. धन्यवाद! #आपली संस्था, आपला परिवार!😊 स्वागतोत्सुक,🙏🏻 #मुचकुंदी परिवार, #मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर (रजि.)
मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा - राजापूर ® संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. नमस्कार!🙏🏻 रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबईतील " पद्मभूषण ताराबाई मोडक शिक्षण केंद्र, दादर (पूर्व) येथे *मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा-राजापूर ® संस्थेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कमी गणसंख्येच्या उपस्थिती मुळे सभा तहकूब करून ३० मिनिटांनी त्याच ठिकाणी सभा पुन्हा सुरू करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांनी या सभेचे अध्यक्ष स्थान भूषविले. सदरील सभेत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. • मागील सभेचे इतिवृत वाचन आणि संमत करणे. • वार्षिक जमा खर्च अहवाल वाचन आणि संमत करणे. • लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयीन आरोग्य सुविधा - आरोग्य विषयक पुढील धोरण. • नवीन कार्यकारणी निवड - स्वागत आणि मनोगत • वार्षिक निधी संकलन - प्राथमिक नियोजन चर्चा संस्थेच्या मागील सर्व साधारण सभेचे इतिवृत वाचन श्री. विनीत म्हादये यांनी केले. या संदर्भातील कृती अहवालाचे वाचन सचिव श्री. अजय मांडवकर यांनी केले. संस्थेचे सल्ला...
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! रक्तदान हेच श्रेष्ठ दान; रक्तदान मोहिमेतून एमपीव्हीएस जपत आहे रक्ताचं नातं! मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर ही सामाजिक संस्था जात - पात - धर्म न मानता तसेच राजकारण विरहित असे सर्वसमावेशक "आपण आपल्यासाठी बनविलेले संघटन" असून मागील सात वर्षे लांजा - राजापूर तालुकास्तरावर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक ऋणानुबंध जपत आहे. तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्यादृष्टीने आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पर्यटन आदी मूलभूत सुविधा बळकटीकरणासाठी संस्था सक्रियपणे कार्यरत आहे. ग्रामीण स्तरावर "आरोग्य" ही बाब अतिसंवेदशील असून संस्थेच्यावतीने वर्धापनदिनाचे औचित्य साधत दरवर्षी ग्रामीण स्तरावर 'आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर’ उपक्रम राबविले जातात. त्याप्रमाणे यावेळी लांजा येथे ग्रामीण टीम (लांजा - राजापूर) अंतर्गत रविवार ८ ऑक्टोबर, २०२३ रोजी "श्री. स्वामी समर्थ जनरल हॉस्पिटल, लांजा" याठिकाणी ग्रामीण टीम (लांजा-राजापूर) अंतर्गत सकाळी ०९ ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत "भव्य रक्तदान शिबीर" आयोजन केले आहे. ...
Comments
Post a Comment