लोकप्रतिनिधीशी पुलासंदर्भात यशस्वी बैठक..

स.न.वि.वि.🙏🏻🙏🏻💐
आभार! आभार! आभार!

रविवार, ११ फेब्रु, २०१८
*#सभावृत्तांत*
संघ्याच्यावतीने आयोजित बैठकीस उपस्तिथ खासदार साहेब, आमदार साहेब, रत्नागिरी जिल्हा शिक्षण सभापती, राजापुर तालुका सभापती, शिवसेना तालुका सपंर्क प्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख, शिवसेना शाखा संघटक, महिला संघटक परिसरातील सरपंच/उपसरपंच, प्रतिष्टित गावकर मंडळी, गावचे पोलिस पाटील, ग्रामस्थ, MPVS पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांचे मनःपूर्वक आभार!!!

मुचकुंदी नदीवर *"गोळवशी ते वडदहसोळ"* पूलबांधणी हा विषय घेऊन आपल्या लोकप्रतिनिधींशी ग्रामस्थ मंडळीनी बऱ्याच वर्षापासूनची मनातील खंत व्यक्त केली.

सभेचे अध्यक्षस्थान सन्माननीय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांनी भूषविले.

MPVS संघाध्यक्ष श्री. विजय भगते साहेब यांनी या आपल्या मनोगतात सांगितले की, आपण एक प्रमाणिक उद्देश् घेऊन संघाच्यावतीने प्रस्ताविक विषय घेतलेला आहे. विकासाला शिक्षण हे महत्वाचे असते. गोळवशी गावातील शाळकरी मुलांचे शाळेत जाताना होणारे हाल, त्यांचे शिक्षणातील नुकसान पाहता शिवाय मध्यवर्ती स्थान असल्याने पूलास या जागेची निवड करण्यात आली. आतापर्यंत आमदार आणि खासदार यांचे या प्रस्तावास उत्तमरित्या सहकार्य लाभले आहे, यपुढेही असेच राहो ही संघाच्या वतीने सदिच्छा व्यक्त केली. उपस्तिथ ग्रामस्थांच्या भरभरुन प्रेमाला आपण भारावुन गेलो असल्याचे देखील म्हटले. रात्रीचे १० वाजले लोक महत्वाकांक्षी पूलासाठी उत्साहतेने हजर राहिले, यावरुनच लक्षात येते की लोकांची पूलाप्रति असलेली लोकभावना जागरूक असल्याचे दिसून येते..

शेवटी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी अद्यक्षीय भाषणात आपण लवकरच नाबार्ड मधून "गोळवशी-वडदहसोळ" दरम्यानचा मुचकुंदी नदीवरील पूल मार्गी लावू अशी ग्वाही दिली. MPVS ने आपल्या प्रस्तात्विक पूल मागणीची चारही बाजुनी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची खासदार साहेब त्यांनी मनापासून प्रशंसा केली, त्यासाठी संघाच्या पाठपुरावा टीमचे देखील मनापासून आभार!!

👉दरम्यान सभेतुन गोळवशी ग्रामचे सरपंच श्री. अशोक गुरव यांनी अतिशय मार्मिक उदाहरणे देत सभेत थेट विषयाला हात घातला, पूल आणि त्याचे महत्व सांगून सर्वांचेच मन जिंकले. शिवाय, वडदहसोळ हायस्कूलच्या माजी विद्यार्थां मित्राने सुंदररित्या आपल्या अनुभवातील गोळवशीकर शाळकरी मुलांच्या जीवघेण्या होड़ीप्रवासाचा प्रसंग व्यक्त केला, शैक्षिणक क्षेत्रातील झपाट्याने वाढत असलेली प्रगती पाहता लवकरच उपाययोजना व्हावी असे देखील नमूद करण्यात आले.

दळणवळणकरीता प्रस्ताविक पूल महत्वपूर्ण आहे, याच पूलामुळे परिसराचा विकास गतिमान होईल. त्याचा फायदा हा इतर आजुबाजूच्या गावांना कोणत्या पध्दतीने? कसा होईल? यावर मार्मिक उत्तर शिवणे सरपंच श्री. साखळकर सर ताशी किलो मीटर प्रमाणे पटवून दिले.

बऱ्याच वर्षापासून लोकांची मागणी शासनदरबारात पोहचविण्यास जे दृढ़निश्चयी ध्येयवादी रोपटे गावच्या सर्वांगीण विकसकार्यास उगवलं आणि पाहता पाहता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्याच वटवृक्षाच्या सावलीत पूल हवा.... असे शब्दरूपी कोडे वडदहसोळचे प्रतिष्टित व शिवसेना शाखा प्रमुख श्री. मनोहर भेरे यांनी बैठकीत आपली भावनिक व्यक्तीमत्व सादर केले. जेनेकरून या पूलामुळे संबध परिसर एक होईल आणि विकासाला चालना मिळेल अशी सदिच्छा व्यक्त केली.

अनेकांच्या मनातील समज गैरसमज संघ सहसचिव श्री. महादेव हातनकर साहेब यानी सहज पटवून दिले.

जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत पोहचुन त्यांना आयोजित सभेबाबतची माहिती पोहचावी याकरिता संघसचिव श्री. गणेश  खानविलकर साहेब व प्रधान संपर्कप्रमुख श्री. अमोल पळसमकर यांनी खरोखर वाख्यानजोग काम केले हे दिसून येते. त्याचप्रमाणे संघाच्यावतीने सर्व कामात ग्रामीण संघटक तुकाराम मिरजोळकर, विजय म्हादये, श्रीकांत मटकर, प्रकाश पळसमकर, तुकाराम म्हादये, सुरेश मिरजोळकर यांचे देखील मोलाचे हातभार लाभले.

सभागृहात जमलेल्या सर्वांचे आभार व स्वागत संघउपाध्यक्ष श्री. सुभाष तांबे साहेब यांनी केले.

धन्यवाद!

🌷 मुचकुंदी परिसर विकास संघ🌷

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"