वडदहसोळ हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकवृंदाने दिली मुचकुंदी नदीला भेट....


―वडदहसोळ हायस्कूलच्या विद्यार्थांचा जीवघेणा होडीप्रवास संपणार याच खुशीने दिली मुचकुंदी नदीला भेट.

परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुचकुंदी तीरावरील "वडदहसोळ-गोळवशी" या ठिकाणी पूलप्रकल्पाच्या "भूमीपुजन" बातमीने सर्वात आनंदले असतील तर ते हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालकवर्ग! 

पावसाळ्यात दुथड़ी भरून नदी प्रवाह विद्यार्थांच्या शिक्षणाला आणि पालकांच्या धास्तीचा मोठा प्रश्न उभा असायचा. वडदहसोळ-गोळवशी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून १७ ते १८ गाव जोडले जाऊन दळणवळणदृष्टया सुसज्ज होऊ शकतात. 

शिवाय दोन्ही तालुक्यांच्या मुख्य् बाजारपेठा तुलनेने कमी अंतराने जवळच्या आहेत.
पुढे गोळवशी-लांजा मार्गे वाहतूक वडदहसोळ पेंढखळे-रानतळे (राजापूर)मार्गे सुसज्ज झाल्यास परिसर हा पूर्णता विकासाच्या दिशेने झेपावताना आपल्याला नक्कीच मिळेल. दोन तालुके एकाच मतदार संघात असल्याने विकासाचा मुख्य केंद्रस्थानी हा परिसर असेल. त्यामुळे परिसरातील गावांना याचा नक्की फायदा होऊ शकतो.

दरम्यान उच्च शिक्षणास किंवा ग्रामस्थांना लांजा बाजरपेठेला जाण्यास हा पूलप्रकल्प अधिक लाभदायक ठरेल. रोजगारीत कमालीचा उच्चांक साधता येईल. लांजा-राजापूर हे कला-क्रीडाचे माहेर घर! त्यामुळे दळणवळण विकासाने परिसरातील शैक्षणिक, रोजगार, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात नक्कीच हा पूल महत्वपूर्ण दुवा ठरणारा आहे.

अशा महत्वाकांक्षी पूलाचे भूमीपुजन शनिवार १८ जानेवारी. २०२० रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे सन्मा. खासदार श्री.विनायक राऊत साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत साहेब, जिल्हा पालक मंत्री श्री. अनिल परब, स्थानिक आमदार श्री.राजन साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सरपंच, गावकरी, शाळकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा- राजापूर

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"